शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

लक्षावधीचा रस्ता गेला खड्ड्यात

By admin | Updated: October 16, 2015 01:06 IST

बहुप्रतीक्षेनंतर रस्त्याचे बांधकाम सुरू झाले. परंतु झालेल्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने लक्षावधी रूपये खर्चुनही रस्त्याचे हाल झाले आहेत.

अपघाताची शक्यता : रेवाबेन पटेल महाविद्यालयासमोरील रस्ताभंडारा : बहुप्रतीक्षेनंतर रस्त्याचे बांधकाम सुरू झाले. परंतु झालेल्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने लक्षावधी रूपये खर्चुनही रस्त्याचे हाल झाले आहेत. ही स्थिती आहे सिव्हिल लाईन परिसरातील रेवाबेन पटेल महाविद्यालयासमोरील रस्त्याची.शहरातील सिव्हील लाईन परिसरात मिस्किन टँक तलावाच्या पाळीपासून ते गुरूदत्त मंगल कार्यालयाच्या परिसरात रस्ता बांधकामाचे काम हाती घेण्यात आले होते. सिव्हील लाईन परिसरातील मुलींच्या वसतीगृहापासून ते वनविभाग कार्यालयाच्या मागील बाजू पर्यंत डांबरीकरणाचे काम करण्यात आले. या मार्गाहून रेवाबेन पटेल महाविद्यालय, मुलींचे वस्तीगृह, परिसरातील नागरिक रहदारी करतात. या रस्त्याहून शेकडो विद्यार्थीनींची रेलचेल असते. कॉलेज मार्गाला जोडणारा हा रस्ता सिव्हील लाईन परिसरालाही जोडतो त्यामुळे या रस्त्याचे विशेष महत्व आहे. मात्र काही महिन्यांपुर्वी या रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर त्याचे पितळ उघडे पडले.मुलींचे वस्तीगृह ते वनविभाग कार्यालयपर्यंतच्या रस्त्यावरील चुरी व डांबर उखडल्याने गिट्टी व मोठे बोल्डर रस्त्यावर पसरले आहे. कॉलेज मार्गाहून आतमध्ये प्रवेश करताच हे दृश्य सर्रास पहायला मिळते. जवळपास २०० मीटरच्या रस्त्याच्या बांधकामाला लक्षावधी रूपयांचा खर्च झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या रस्त्याच्या बांधकामाचे कंत्राट तुमसर येथील एका कंपनीला देण्यात आले होते. मात्र रस्त्याची स्थिती पाहून बांधकामाची गुणवत्ता किती श्रेष्ठ आहे हे लक्षात येते. रस्त्यावरील बोल्डर वर आल्याने दुचाकीवाहन चालकांना जीव मुठीत घेवून रहदारी करावी लागत आहे. याच रस्त्यावर रेवाबेन पटेल नामक नामांकित महाविद्यालय असून उच्च विद्याविभूषित प्राचार्य गणांसह अनेकवेळी खासदार, आमदार व अन्य पदाधिकारीही याच रस्त्याचे ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या स्थितीबाबत कुणीही बोलायला तयार नाही. सायंकाळच्यानंतर या परिसरात जास्त वर्दळ नसते. मात्र कॉलेजच्या वेळेवर विद्यार्थीनींची मोठी गर्दी असते. रस्त्यावर चुरी पसरली असल्याने वाहन स्लिप होवून केव्हा अपघात होईल याची शाश्वती नाही. राज्य बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रमाणे सदर रस्त्याचे बांधकाम झाले नसल्याचे माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहिती अंतर्गत प्रथम दर्शनी लक्षात येते. रस्त्याचा दर्जा पाहून बांधकामात गैरव्यवहार झाल्याचेही परिसरात चर्चा आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व सदर रस्त्याचे बांधकाम संबंधित विभागाच्या धोरणानुसार करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)