शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचा महसूल तरीही बाजारात कचराकोंडी

By admin | Updated: July 22, 2016 00:44 IST

जिल्ह्याचे मुख्यालय लाभलेल्या भंडारा शहरातील हृदयस्थानी वसलेल्या आठवडी बाजाराचे कुणी सौंदर्य बघितले ...

व्यथा आठवडी बाजाराची : अतिक्रमणाची समस्या सुटेना, बाजाराच्या विकासासाठी निधीचा वाणवा इंद्रपाल कटकवार भंडारा जिल्ह्याचे मुख्यालय लाभलेल्या भंडारा शहरातील हृदयस्थानी वसलेल्या आठवडी बाजाराचे कुणी सौंदर्य बघितले तर भोवळ आल्याशिवाय राहणार नाही. दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील नागरिक गलिच्छ परिसरात बाजारासाठी येण्याचे धाडस तरी कसे करतात, असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. नगर पालिका प्रशासनाला लाखोंचा महसूल देणारा आठवडी बाजार विकासाच्या गर्तेत रखडला आहे. अतिक्रमण व मुलभूत सुविधांचा अभाव या बाजाराची वैशिष्टे आहे. शहरातील रविवारी बाजारपेठ म्हणून अशी जुनी ओळख असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालय परिसरात मोठा बाजार भरतो. रविवारी मुख्य बाजार तर बुधवारी लहान बाजार भरतो. सर्व प्रकारच्या भाज्या येथे मिळत असल्याने रविवारी मोठ्या संख्येने भंडारेकर बाजारासाठी येत असतात. मोठ्या बाजारातील हनुमान मंदिर परिसर ते पोष्ट आॅफिस चौकापर्यंतचा भाग व तिथून गभने चौरस्ता व परत शर्मा बालोद्यानपर्यंतचा भुभाग मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. असंख्य दुकाने, उपहारगृहे, फेरीवाले यासह भाजीपाल्यांची थोक व चिल्लर दुकाने आहेत. अनाज मंडीच्या मागे असलेल्या सिमेंटी ओट्यापासून बाजाराची सुरूवात होते. येथूनच मागच्या बाजुला असलेल्या दुर्गा मंदिराच्या मागे मटण मार्केट आहे. याच्याच विरूद्ध दिशेला कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या समोर मोठा भाजी बाजार भरतो. मात्र या बाजारात सुविधांचा वाणवा आहे. पावसाळ्यात बाजारात जातो, असे म्हटल्यास सर्वात प्रथम दृष्टीक्षेपात तिथे असलेला चिखल नजरेस पडतो. अतिक्रमणाने वेढलेले सिमेंटी ओटे, तुटलेले शेड्स, मुतारीघराची दुरवस्था, खड्डे, निमुळत्या व अरूंद नाल्यांमध्ये साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी, समिती कार्यालयाच्या सभोवताल साचलेली दुर्गंधी ही या आठवडी बाजाराचे विशेष आकर्षण आहे. भंडाराच्या विकासात आठवडी बाजाराचे सौंदर्यीकरण करणे अपेक्षित आहे. बाजारात अतिक्रमणाची समस्या मुख्य असून त्यावर आमचे कार्य सुरू आहे. भविष्यात यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. यात कुणाचीही गय केली जाणार नाही. -बाबुराव बागडे, नगराध्यक्ष भंडारा. बाजाराच्या विकासाबाबत विशेष सभा बोलवावी, अशी मागणी कित्येकदा केली आहे. परंतु पालिका प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. सन २००९ फेरीवाले धोरण नगरपालिका प्रशासनाने अंमलात आणल्यास शहरातील वाहतुकीसह बाजाराची समस्या ९० टक्के निकाली निघू शकते. बाजारात सिमेंटी ओटे, शेड्स, मुतारीघर, पक्के रस्ते व नाल्यांची बांधणी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. -हिवराज उके, नगरसेवक भंडारा.