शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बंद असतानाही फिरते पीठ गिरणीचे मीटर

By admin | Updated: December 27, 2014 01:08 IST

अनेकदा चकरा माल्यानंतर करडी विद्युत विभागाने आॅक्टोंबर २०१४ मध्ये बोरगाव येथील आटाचक्की मालक अभिमन अतकरी यांचे चक्कीला मीटर बसविले.

करडी/पालोरा : अनेकदा चकरा माल्यानंतर करडी विद्युत विभागाने आॅक्टोंबर २०१४ मध्ये बोरगाव येथील आटाचक्की मालक अभिमन अतकरी यांचे चक्कीला मीटर बसविले. परंतु मीटर बंद असतानाही आकडे सतत बदलत असतात. त्यामुळे आटा चक्कीचे बिल अव्वाच्या सव्वा येत आहेत. अतिरिक्त बिलामुळे मालक त्रस्त असून चक्कीच बंद करण्यापर्यंत मानसिकता ठासळली आहे. करडी येथील विद्युत विभागाच्या बेबंदशाही धोरणामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त आहेत. आता व्यावसायिकही नाहक बळी ठरत आहेत. बोरगांव येथील आटाचक्की मालकाला सदोष मीटर बसविण्यात आले. आटाचक्की बंद असतानाही मीटर सतत फिरत असते. त्यामुळे रिडिंग वाढत जाऊन महिन्याचे विजेचे बिल फुगून येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून डिसेंबर २०१४ चे वीज बिल ३ हजार ८०० रुपये पाठविण्यात आले. वीज बिलामुळे अभिमन अतकरी यांचे आर्थिक व मानसिक संतुलन बिघडले आहे. विनाकारण आर्थिक भुर्दंड त्यांना दिला जात आहे. वीज वितरण कंपनी शाखा करडीचे लाईनमन बेहलपाडे रिडींग घेण्याकरिता प्रत्यक्ष आले असता त्यांनीसुध्दा मीटर दोष पाहिला आहेत. त्वरित मीटर बदलवून नवीन मीटर लावण्याची मागणी अतकरी यांनी केली आहे. (वार्ताहर)