शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढनंतरही दूध उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:00 IST

दुधाच्या दराविषयी तीन वर्षापासून दूध उत्पादकांना प्रचंड असंतोष असून आंदोलनेही झालीत. राज्य शासनाने अलीकडेच दूध उत्पादकांना योग्य तो न्याय न मिळवून दिल्याने राज्य सरकारने जो निर्णय घेतला, त्यावर भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने पुढाकार घेवून जिल्ह्यातील दूध उत्पादक सहकारी संस्था व दूध उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणली. सभेपुढे शासनाच्या 'त्या' परिपत्रकात दुरुस्ती तातडीने करुन दूध उत्पादकांना न्याय द्यावा, असा ठराव घेण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा दुग्ध संघाचा पुढाकार : सभेमध्ये घेतला परिपत्रकात दुरुस्ती करण्याचा ठराव
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुधाच्या दराविषयी तीन वर्षापासून दूध उत्पादकांना प्रचंड असंतोष असून आंदोलनेही झालीत. राज्य शासनाने अलीकडेच दूध उत्पादकांना योग्य तो न्याय न मिळवून दिल्याने राज्य सरकारने जो निर्णय घेतला, त्यावर भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने पुढाकार घेवून जिल्ह्यातील दूध उत्पादक सहकारी संस्था व दूध उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणली. सभेपुढे शासनाच्या 'त्या' परिपत्रकात दुरुस्ती तातडीने करुन दूध उत्पादकांना न्याय द्यावा, असा ठराव घेण्यात आला.भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने पुढाकार घेऊन शनिवारला येथील मंगलम सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केले होते.या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संस्था नागपुरचे विभागीय उपनिबंधक सहकारी संजय क्षीरसागर होते. मुख्य अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी निलेश बंड उपस्थित होते.चर्चासत्राला सुरुवात होताच शासनाच्या चुकीच्या धोरणाने घेतलेल्या निर्णयाच्या त्रृट्या काढीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी शासनावर तोफ डागत जिल्ह्यातील दूध उत्पादकांना शासन नेहमीच वेठीला धरतो. सतत दूध उत्पादकांवर अन्याय होत असताना शासनाने नुकताच दूध उत्पादकांच्या बाबतीत निर्णय घेतला तो देखील चुकीचा असून काढण्यात आलेल्या परिपत्रकात शासनाने तातडीने दुरुस्ती करावी, दूध उत्पादकांना न्याय द्यावा, असा सवाल केला. त्यांनी सभेपुढे ठराव मांडला असता तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.या सभेला जिल्ह्यातील दुग्ध सहकारी संस्थेचे अध्यक्ष, जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक, दुग्ध संघाचे संचालक मंडळ आदी उपस्थित होते.विभागीय उपनिबंधक क्षीरसागर यांनी शासनाची भूमिका सभेपुढे मांडली. सतत तीन वर्षापासून दूध उत्पादकांचा प्रचंड असंतोष होत होता. काही प्रमाणात आंदोलनेही झालीत, त्यावर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन दूध उत्पादक संघांना तसेच दूध उत्पादक शेतकºयांना कुठेतरी मदत मिळावी म्हणून नुकताच शासकीय निर्णय काढून समाधान केले. शासकीय निर्णयानुसार दूध भुकटी व द्रवरुप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुक्रमे ५० रुपये प्रती किलो आणि त्यावर ५ रुपये प्रती लिटर प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे ठरविले. यात मात्र आॅनलाईन पद्धतीने दूध उत्पादक सहकारी संस्थांनी व शेतकºयांनी व्यवहार करावा. त्यालाच हे अनुदान मिळेल, असे शासनाच्या वतीने ठामपणे सांगितले. यावेळी दुग्ध उत्पादकांनी व्यथा मांडल्या.तत्पुर्वी जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन दुग्ध संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके, आभार प्रदर्शन संतोष शिवणकर यांनी केले.