शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकला स्पर्धेतून गिधाड वाचविण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:20 IST

येथील ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लब लाखनी तर्फे जागतिक गिधाड दिनाच्या निमित्ताने १ ते ७ सप्टेंबर गिधाड जागृती आठवडा साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देग्रीनफ्रेन्ड्सचा उपक्रम : जागतिक गिधाड दिनानिमित्त जागृती आठवडा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : येथील ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लब लाखनी तर्फे जागतिक गिधाड दिनाच्या निमित्ताने १ ते ७ सप्टेंबर गिधाड जागृती आठवडा साजरा करण्यात आला.विद्यार्थी व नागरिकांमध्ये नष्टप्राय होत असलेल्या दुर्मिळ गिधाड पक्षाविषयी जनजागृती होण्याकरिता दुर्मिळ गिधाड चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या चित्रकला स्पर्धेमध्ये सिद्धार्थ विद्यालय सावरीचे हरित सेनेचे विद्यार्थी तसेच राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाचे हरित सेना विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी ग्रीनफ्रेन्डस्चे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी उपस्थित स्पर्धक विद्यार्थ्यांना गिधाड पक्ष्याची संख्या कमी होण्यामागची कारणे समजावून दिलीत. यात प्रामुख्याने जनावरांना डायक्लोफेनॅक नावाच्या औषधीमुळे त्यांची प्रजनन शक्ती क्षीण होणे, मेलेले जनावर गिधाड पक्ष्यांना उपलब्ध न होणे व त्यांचे अधिवास असलेले क्षेत्रामध्ये पर्यावरणीय संकट येणे हे प्रमुख कारणे त्यांनी स्पर्धकांना पटवून दिली.ग्रीनफ्रेन्डस्चे पदाधिकारी व सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार, सिद्धार्थ विद्यालयाचे हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे व ग्रीनफ्रेन्डस् पदाधिकारी अशोक वैद्य यांनी दुर्मिळ गिधाड चित्रकला स्पर्धेविषयी रेखाटन, माहिती, रंगकाम व भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख गिधाड प्रजातीचे माहिती याबद्दल माहिती पुरविली.यानंतर स्पर्धक विद्यार्थ्यांनी पाल्या पुठ्ठ्याचे गिधाड, भारतीय गिधाड, युरेशियन गिधाड व राजगिधाड यावर आधारित चित्रे रंगवून सादर केलीत. सिद्धार्थ विद्यालय सावरी मधून प्रथम क्रमांक जान्हवी भुरे हिला प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक प्रतीक राऊत, नेहा चाचेरे यांना प्राप्त झाला. तर तृतीय क्रमांक रूचिता गायधनी, संजना मेहर व मुशर्रफ शेख यांना प्राप्त झाला. राणी लक्ष्मी कन्या विद्यालय लाखनी मध्ये मिडलस्कुल गटातून प्रथम क्रमांक गायत्री वैद्य हिला प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक मनस्वी गभणेला तर तृतीय क्रमांक चेतना फंदे व स्वीटी लांजेवार यांना प्राप्त झाला.हायस्कुल गटामधून प्रथम क्रमांक सुहानी भोवते हिला तर द्वितीय क्रमांक नित्या नवखरे, पियुषा भलावी यांना प्राप्त झाला. तृतीय क्रमांक प्रांजली उईके हिला प्राप्त झाला. महर्षी विद्या मंदिर भंडाराचा विद्यार्थी पुष्कर सोलंकी याला प्रथम तर पोदार इंटरनॅशनल स्कुल भंडाराचा विद्यार्थी अथर्व गायधने याला द्वितीय क्रमांक तर एमडीएन फ्युचर स्कुल लाखनीचा विद्यार्थी अर्णव गायधने याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. समर्थ विद्यालय लाखनी मधून प्रथम क्रमांक वज्रेश मेश्राम याला प्राप्त झाले तर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे भूषण धांडे, अमन लांजेवार व रोहित देशमुख यांना प्राप्त झाला.स्पर्धेचे परीक्षण ग्रीनफ्रेन्डस्चे पदाधिकारी दिनकर कालेजवार, अशोक वैद्य, सिद्धार्थ विद्यालय सावरीचे हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे यांनी केले. कार्यक्रमाकरिता सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य धनंजय तिरपुडे, राणी लक्ष्मी कन्या विद्यालय मुख्याध्यापिका संध्या हेमणे, हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर, समर्थ विद्यालय प्राचार्य दा.ई. प्रधान, हरित सेना शिक्षक अनिल बडवाईक यांनी स्पष्ट केले. विजेत्या स्पर्धेकांना येत्या कार्यक्रमात गौरविण्यात येईल.