प्रथम परीक्षेत जानवी कारेमोरे हिने ९५ गुण घेऊन सुवर्ण पदक प्राप्त केले. पूर्वा नागलवाडे हिने ९२ गुण मिळवून रजत पदक तर अभिषेक सावसाकडे याने ९० गुण मिळवून कास्य पदक प्राप्त केले. द्वितीय परीक्षेत हर्षनु बारस्कर याने ९५ गुण मिळवून सुवर्णपदक तर प्रवीण दोनोडे याने ९० गुण मिळवून रजत पदक तर ओम बुजाडे याने ८० गुण मिळवून कास्यपदक प्राप्त केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. बारई, पर्यवेक्षक डी. पी. राठी यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव वझलवार, सचिव रवींद्र भालेराव यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी उपस्थित होते. संचालन परीक्षा प्रमुख कल्याणी जोशी यांनी तर अनुराधा फडणवीस यांनी आभार मानले.
भंडारा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:36 IST