शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात मेरिट बचाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 22:14 IST

राज्यातील ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या वतीने येथील त्रिमूर्ती चौकात भर पावसात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेले प्रत्येक जण छत्र्या घेऊन होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन कृती समितीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या वतीने येथील त्रिमूर्ती चौकात भर पावसात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेले प्रत्येक जण छत्र्या घेऊन होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.सार्वसामान्य वर्गातील नागरिकांसाठी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले. सर्वौच्च न्यायालयाने १९९२ च्या नयना सहानी प्रकरणात शिक्षण तसेच नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि ५० टक्के वाटा मेरिट, पात्रता, प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आला होता. यामागे देशाचा विकास व्हावा हा हेतू होता. महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य वर्ग तसेच मेरिट करीत ४८ टक्के पदांमध्ये तूट करून आरक्षण घोषित केले. यामुळे राज्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न आहे. यामुळे तरुण मुले मुली नैराश्याच्या छायेत जात आहेत, असे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.सेव्ह मेरिट, सेव्ह नेशनचा लढा जाती किंवा आरक्षणाविरुद्ध नसून देशात योग्यतेचे महत्व वाचविले पाहिजे यासाठी आहे. या मोहिमेंतर्गत भंडारातील सर्व खुल्या प्रवर्गातील लोकांनी येथील त्रिमूर्ती चौकात एकत्र येऊन अतिरिक्त जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. या भर पावसात या आंदोलनात नागरिक छत्र्या घेऊन सहभागी झाले होते. महिलांची यात लक्षणीय उपस्थिती दिसत होती. तुमसर तालुक्यातील नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते.या आंदोलनाला नागपूर येथील विनोद फाफट, नवीन चांडक, डॉ.अर्चना कोठारी यांनी मार्गदर्शन केले. सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन भंडारा जिल्हा कृती समितीतर्फे डॉ.गोपाल व्यास, किरिट पटेल, डॉ.मोनिका बत्रा, रामविलास सारडा, जयेश संघानी, दिशा अग्रवाल, तुलसी सारडा, शैला शर्मा, पंकज मुंदडा आदी सहभागी झाले होते.सिंधी समाज, पंजाबी समाज, गुजराती समाज, मारवाडी समाज, ब्राम्हण समाज, माहेश्वरी युवा संघटनेचे विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भर पावसात झालेल्या या आंदोलनाने भंडाराकरांचे लक्ष वेधून घेतले होते.