शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पारा @ ४५.५

By admin | Updated: May 16, 2017 00:19 IST

गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने नागरीकांसह पशुपक्ष्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.

नवतपापूर्वीच उष्णतेची लाट : बालगोपालांसह नागरिक त्रस्त, रस्ते निर्मनुष्यलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने नागरीकांसह पशुपक्ष्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. दरवर्षी मे महिन्यात पारा ४४ अंशांच्यावर पोहोचतो. यंदा नवतपापूर्वीच भंडारा जिल्हा तापू लागला आहे. सोमवारी पारा ४५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. यावर्षीचा सर्वाधिक तापमान नोंदविला गेला.यंदाचा उन्हाळा जीवघेणा आहे की काय? असे वाटू लागले आहे. सकाळी ९ वाजतापसून सुरू झालेली उन्हाची प्रखरता सायंकाळी ५ वाजतापर्यंत कायम राहत असल्याने याचा परिणाम जनजीवनावर बघायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र उन्हाची तीव्रता जास्त जाणऊ लागली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घेण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असतो.यावर्षीचा उन्हाळा मागील सर्व विक्रम मोडीत काढणार, असा कयास व्यक्त केला जात होता. यावर्षी ६ मार्चला पारा ४३.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. मागील वर्षी म्हणजे मे २०१६ मध्ये पाऱ्याने चाळीशी ओलांडत १४ मे रोजी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पारा ४५ अंशांवर गेला होता. मागील वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४०-४२ अंश सेल्सिअसच्या घरात होते. सन २०१५ मध्ये २१ मे रोजी तापमान ४६.५ अंश नोंदविण्यात आले होते. यावर्षी १५ मे ला पारा ४५.५ अंश सेल्सिअस या वाढत्या तापमानामुळे हा उच्चांक मोडीत निघाला. चार दिवसांपासून मात्र उष्णतेची लाट पसरली आहे.नवतपा २५ मे पासूनसंपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने नागरिकांची होरपळ होत असून, उन्हाच्या दाहकतेने जीवाची काहिली होत आहे. मे महिन्याच्या २५ तारखेपासून नवतपाला प्रारंभ होणार आहे. नवतपा प्रारंभ व्हायला १० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे परंतु भंडारेकर नवतपापुर्वीच उन्हाची दाहकता अनुभवत आहेत.