शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेगा ब्लॉकमुळे मेगा जाम

By admin | Updated: July 19, 2015 00:38 IST

तुमसर रोड येथे दक्षिण पूर्व रेल्वेने शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी सकाळी आठवाजेपर्यंत मेगा ब्लॉक केला.

स्लिपर बदलण्याची कामे : १२ तास रेल्वे फाटक बंदचा फटकातुमसर : तुमसर रोड येथे दक्षिण पूर्व रेल्वेने शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी सकाळी आठवाजेपर्यंत मेगा ब्लॉक केला. यामुळे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर सुमारे अडीच ते तीन किमीपर्यंत वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. रेल्वे ट्रॅकवरील स्लिपर बदलणे ही मुख्य कामे यावेळेत करण्यात आली. पुन्हा २९ जुलै रोजी डाऊन ट्रॅकवर मेगा ब्लॉक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तुमसर रोड येथे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर एल. एम. ५३२ क्रमांकाचे रेल्वे फाटक आहे. या फाटकावर रेल्वे रुळ ओव्हर व्हॅलींग (वर) आले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅक्टवरील सिमेंट स्लिपर बदलविण्याचा निर्णय घेतला. रायपूर विभागाने तसा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवार व शनिवारी अप लाईनवरील मेगा ब्लॉक होता. पुन्हा २९ जुलै रोजी डाऊन लाईनवर मेगा ब्लॉक करण्यात येईल अशी माहिती आहे. १२ तासपर्यंत रेल्वे फाटक बंद होते. रेल्वे कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी ही कामे रात्रभर केली. दरम्यान तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर वाहनांच्या दोन ते अडीच किलोमिटरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या. मेगा ब्लॉकमुळे वाहनचालकांनी रस्त्यावरच रात्रीचे भोजन तयार केले. पाऊस नसल्याने त्यांचे फावले. पाऊस असता तर मार्गावर अडलेल्या प्रवाशांची मोठी फजिती झाली असती. रेल्वे प्रशासनाने येथे दुसरा बायपास रस्ता तयार केला नसल्याने या मार्गाशिवाय पर्याय नाही. (तालुका प्रतिनिधी)उड्डाण पुलाचे कामे कासवगतीनेतुमसर रोड येथे उड्डाण पूल प्रस्तावित आहे. चार महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली. परंतु कामे कासवगतीने सुरु आहे. सध्या नालीवर बायपास रस्त्याची कामे सुरु आहेत. पावसाळा सुरु झाल्याने कामाचा वेग मंदावला आहे.दिवसातून या रेल्वे मार्गावर २२० मालवाहू व प्रवाशी रेल्वे गाड्या धावतात. येथे प्रचंड वाहतूकीची कोंडी निर्माण होते. हा मार्ग प्रवाशांकरिता अत्यंत कमालीचा त्रासदायक ठरत आहे. आमदार तथा खासदारांनी राज्य व केंद्र शासनाकडून भरघोष निधी खेचून आणण्याची गरज आहे.