शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

विषय शिक्षकांच्या मुद्यावरून सभा गाजली

By admin | Updated: September 10, 2016 00:35 IST

जिल्ह्यात विज्ञान शिक्षकांची ९९ पदे रिक्त आहेत. त्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत व बारावी विज्ञान अहर्ताधारक शिक्षकांना सामावून घ्यावे.

विद्यार्थिनींना नॅपकीन मिळणार : जिल्ह्यातील प्रत्येक शाळांना होणार क्रीडा साहित्यांचा पुरवठाभंडारा : जिल्ह्यात विज्ञान शिक्षकांची ९९ पदे रिक्त आहेत. त्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत व बारावी विज्ञान अहर्ताधारक शिक्षकांना सामावून घ्यावे. तथा पदवीधर शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून पदोन्नती देण्याचा मुद्दा शिक्षण समितीच्या सभेत चांगलाच गाजला. पहिले या मुद्याचा निपटारा लावा त्यानंतरच सभा चालू ठेऊ, अशी आग्रही भूमिका जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती राजेश डोंगरे यांनी लावून धरल्यामुळे शिक्षण समितीची सभा चांगलीच गाजली. उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेला समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, अशोक कापगते, धनेंद्र तुरकर, राणी ढेंगे, संगिता मुंगूसमारे, प्रणाली ठाकरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) थोरात, शिक्षणाधिकारी (प्राथ.) सुवर्णलता घोडेस्वार, अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यात विज्ञान विषयाच्या शिक्षकांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये जे शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी काही शिक्षक विज्ञान अहर्ताधारक आहेत. याशिवाय पदविधर शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून पदोन्नती देऊन शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी आहे. विज्ञान विषयाची ९९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मुद्यावर शिक्षण समितीचे सभापती राजेश डोंगरे, मुबारक सय्यद, रमेश सिंगनजुडे यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत सभा रोखून धरले. यावेळी सभापती राजेश डोंगरे यांनी कार्यशाळेतील मुद्याचे निराकरण होईपर्यंत सभा होऊ देणार नसल्याची तंबी शिक्षणाधिकाऱ्यांना दिली. खुद्द उपाध्यक्षांच्या आक्रमक पवित्र्याने या सभेत २३ सप्टेंबरला या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेत विशेष सभा घेण्याचा ठराव घेण्यात आला. विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून अध्यापनाचे धडे देता यावे, यासाठी २६ आॅगस्टला ‘मन करा रे प्रसन्न’ हे प्रशिक्षण आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना बोलविण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला. यासोबतच सर्व शिक्षकांना डीसीपीएसच्या पैशाची पावती देण्यासंदर्भात काम सुरू असून त्या लवकरच मिळणार असल्याचे सांगितले. पाचवीच्या पुढील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा करण्याच्या दृष्टिने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील ज्या शाळांच्या ईमारती धोकादायक स्थितीत आहेत, अशांच्या दुरूस्तीसाठी सर्व शाळांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनाही देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदच्या शाळांना तीन लाख रूपयांपर्यंत क्रीडा साहित्य पुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)मोहाडी पं.स.चा मुद्दावर गदारोळमोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात वेतनाच्या पैशाचा गैरवापर झाला आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी आलेल्या रक्केचे पूर्ण वाटप करण्यात येत नाही. त्यामुळे रक्कम शिल्लक राहते. दोन शिक्षकांचे दोनवेळा वेतन काढल्याचा मुद्दा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी आग्रही भूमिका रमेश सिंगनजुडे व मुबारक सय्यद यांनी घेतली. या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमली असून अहवाल येताच दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन सभेत देण्यात आले. जिल्ह्यात १७४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. राज्य शासनाने नवीन पदभरती बंद केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या पात्रता बघून पदोन्नती करणे व आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.- राजेश डोंगरे, सभापती, शिक्षण समिती जि.प. भंडारा.