शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी विरोधात वैद्यकीय प्रतिनिधींचा संप

By admin | Updated: February 4, 2017 00:18 IST

महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधींनी विविध मागण्यांसाठी मागणीदिवस पाळल्यानंतरही केंद्र शासनाने त्याची दखल घेतली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : समस्यांची पूर्तता कराभंडारा : महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधींनी विविध मागण्यांसाठी मागणीदिवस पाळल्यानंतरही केंद्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर वैद्यकिय प्रतिनिधींनी शुक्रवारी संप पुकारून केंद्र शासनाचा निषेध केला. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना सोपविले. केंद्र व राज्य शासन वैद्यकिय प्रतिनिधींसाठी असलेल्या कामगार कायद्याच्या अंमलबजावणीला टाळाटाळ करीत आहे. अनेक वर्षांचा प्रयत्नानंतर वैद्यकिय प्रतिनिधींसाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय द्विपक्षीय समितीची बैठक केंद्रीय कामगार मंत्र्यांनी अनेकदा आश्वासने देवून बोलविली नाही. परिणामी औषधी कंपनीचे मालक उन्नमत झाले आहेत. वैद्यकिय प्रतिनिधींना विविध प्रकारे त्रास दिल्या जात आहे. त्यामुळे देशातील अनेक वैद्यकिय प्रतिनिधींनी आत्महत्या केलेल्या आहेत. वैद्यकिय प्रतिनिधींसाठी असलेल्या सेल्स प्रमोशन एम्प्लाईज अ‍ॅक्ट १९७० अंतर्गत फार्म ‘ए’ मध्ये अपॉइमेंट पत्र मिळणे, त्यांच्या कामाचे स्वरुप ठरविणे, त्यांची अंमलबजावणी न करता केंद्र व राज्य शासन मालक धर्जणी भूमिका घेत आहेत. १९८२ च्या औद्योगिक विवाद कायद्याप्रमाणे विक्री संवर्धन उद्योग घोषित होवून सुध्दा शासन औषधी कंपन्यांचा दबावाखाली त्याची अंमलबजावणी करीत नाही. एकीकडे महागाईने देशातील नागरिक त्रस्त आहे. केंद्र शासन औषध व वैद्यकिय उपकरणांच्या किंमती नियंत्रीत न करता औषध व वैद्यकिय उपकरण उत्पादकांना मोकाट सोडले आहे. त्यामुळे जनता महागाईखाली भरडली जात आहे. औषधांचा व वैद्यकिय उपकरणांचा किंमती तसेच त्यावरील अबकारी कर उत्पादन खर्चावर आधारित असावेत, औषध उत्पादकांना १० टक्के प्रतीवर्ष दर वाढविण्याची कायदेशिर मुभा सरकारने दिली आहे. पेट्रोलियम पदार्थाप्रमाणे औषधांवर अनेक कर लावल्यामुळे औषधी महाग होत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने औषधांवर जीएसटी लागू करु नये, अशी मागणी संपकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. संपात जिल्ह्यातील बहुतांश वैद्यकिय प्रतिनिधींनी हजेरी लावली होती.शिष्टमंडळात वैद्यकिय प्रतिनिधी संघटनेचे सचिव व्यंकटेश शर्मा, अजय धांडे, अनिल शिंदे, अविनाश तिरपुडे यांच्यासह वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या पदाधिकारी तसेच सदस्यांचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)