शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मोहिमेसाठी वैद्यकीय संघटना सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 21:48 IST

गोवर-रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय संघटनांनी पुढाकार घेतला असून या मोहिमेविषयी माहिती देण्यासाठी आरोग्य विभागांनी जिल्ह्यातील वैद्यकीय संघटना व डॉक्टरांची नुकतीच कार्यशाळा घेतली. भंडारा जिल्हयात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी वैद्यकीय संघटनांनी केला.

ठळक मुद्देगोवर-रुबेला मोहीम : शाळा, अंगणवाडी व उपकेंद्रस्तरावर राबविणार मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोवर-रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय संघटनांनी पुढाकार घेतला असून या मोहिमेविषयी माहिती देण्यासाठी आरोग्य विभागांनी जिल्ह्यातील वैद्यकीय संघटना व डॉक्टरांची नुकतीच कार्यशाळा घेतली. भंडारा जिल्हयात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी वैद्यकीय संघटनांनी केला.आय.एम.ए. सभागृह भंडारा येथे भारतीय वैद्यकीय संघटना आणि भारतील बालरोग अकादमी यांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेचे उदघाटन आय.ए.पी. अध्यक्ष डॉ. अशोक ब्राम्हणकर, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. पुनम बावनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेला खाजगी डॉक्टर, आय.एम.ए. सदस्य, आय.ए.पी. सदस्य, प्रसुती विज्ञान व स्त्री विज्ञान सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.गोवर रुबेला लसीकरण शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संघटना आणि भारतीय बालरोग अकादमी यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच भंडारा जिल्हयातील सर्व बालरोग तज्ञांचे संपूर्ण सहकार्य लसीकरण मोहिमेसाठी मिळेल, असे डॉ. अशोक ब्राम्हणकर व डॉ. अशोक चौलेरा यांनी जाहिर केले. लसीकरणाचे लाभार्थी हे ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील असल्यामुळे बालरोग तज्ञाची महत्वाची भूमिका आहे.गोवर रुबेला मोहिम नोव्हेंबर २०१८ मध्ये भंडारा जिल्हयामध्ये आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षापर्यंत वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यापैकी काही लाभार्थ्यांना जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल तरी त्यांना हा अतिरिक्त डोस दयावयाचा आहे. गोवर रुबेला मोहिम सर्व शासकीय शाळा, खाजगी शाळा, आश्रम शाळा, अंगणवाडी व उपकेंद्र स्तरावर राबविण्यात येणार आहे.गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे जो मुख्यत: लहान मुलांना होतो व या आजारानंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे बालकाचा मृत्यू होऊ शकतो. रुबेला हा त्यामानाने सौम्य संक्रामक आजार जरी असला तरी गर्भवती स्त्रियांना रुबेला आजाराचा संसर्ग झाल्यानंतर अचानक गर्भपात किंवा नवीन जन्म झालेल्या बाळास जन्मजात दोष जसे अंधत्व, बहिरेपणा आणि हृदय विकृती होऊ शकते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी प्रास्ताविकात गोवर-रुबेला ही मोहिम ही जिल्हयातील सर्व शाळांमध्ये व अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खाजगी डॉक्टरांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले. डॉ. फुलचंद मेश्राम यांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार जिल्हा बाल संगोपन अधिकारी माधूरी माथुरकर यांनी मानले.