शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

पोलिसांच्या कलमा माझ्यासाठी मेडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 00:41 IST

पोलिसांनी कोणाच्याही दबावात येऊ नये. त्यांनी निपक्षपणे कर्तव्य बजवावे. ठाणेदारांनी सिंघमची भूमिका बजवावी.

शांतता सभा : राजेंद्र पटले यांचे प्रतिपादनमोहाडी : पोलिसांनी कोणाच्याही दबावात येऊ नये. त्यांनी निपक्षपणे कर्तव्य बजवावे. ठाणेदारांनी सिंघमची भूमिका बजवावी. मी न्यायाच्या व सत्याच्या नेहमी पाठीशी राहत आलो आहे. शेतकरी, मजूर, युवकांच्या भल्यासाठी अनेक मार्चे, आंदोलन केले आहे. त्या वेगवेगळ्या आंदोलनात माझ्यावर पोलिसांनी कलमा लावल्या त्या कलमा मी माझ्यासाठी मेडलच समजतो, अशी गर्जनायुक्त प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी केले.कान्हळगाव (सिरसोली) येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर एका तरूणीला मारहाण झाली. त्या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद रजिस्टर करून आरोपीला सोडून दिले. आरोपीला अटक करावी, तरूणीचे बयान पुन्हा महिला पोलिसांकडून नोंदविण्यात यावे, आदी मागण्यांसाठी कान्हळगाव, सिरसोली येथील ग्रामपंचायतच्या प्रांगणात आंदोलनाची भूमिका निश्चित करण्यासाठी शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत जनतेला संबोधित करताना शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले बोलत होते. शांतता सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मेघा उटाणे होत्या. मंचावर उपसरपंच राजू उपरकर, आंधळगावचे ठाणेदार मनोज काळबांधे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर कस्तुरे, सतीश ईटनकर, रक्षा बागडे, राजकुमार बांते, प्रा. डॉ. सुनिल चवळे, सिनेट सदस्य नितेश फुलेकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना, राजेंद्र पटले म्हणाले, काही पक्षाच्या नेत्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांचा त्यांनी जाहीर निषेध केला. या प्रकरणात तरूणीला न्याय मिळालानाही तर मी कान्हळगावासीच्या लोकांसोबत राहून ५ मे च्या मोर्च्याचे नेतृत्व करणार आहे तसेच पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपीला अटक करावी असा इशारा पोलिस प्रशासनाला दिला आहे. यावेळी आंधळगावचे ठाणेदार यांनी मोर्चा काढण्याची वेळे जनतेवर येणार नाही. आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल. गावकऱ्यांनी एका तरूणीच्या अन्यायाबाबत एकजुटता दाखविली. याचे मला कौतूक करावेसे वाटत तसेच यावेळी प्रा. डॉ. सुनील यवळे, माजी सरपंच अनुप उटाणे, नितेश फुलेकर, राजकुमार बांते यांनीही नागरिकांना मार्गदर्शन केले. सभेचे संचालन राजू उपरकर, आभार मेघा उटाणे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)