शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धान शेतीसाठी यांत्रिकीकरण अत्याआवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या वतीने भंडारा तालुक्यातील जाख येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहात यांत्रिकीकरण योजनेतून धान लागवडीसाठी यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण व श्री पद्धतीने धान लागवड प्रात्यक्षिके अधिकाऱ्यांतर्फे दाखवण्यात आली.

ठळक मुद्देहिंदुराव चव्हाण : भंडारा तालुक्यातील जाख येथे प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या शेतकऱ्यांना धान शेतीसाठी अधिक खर्च येत असल्याने धानाची शेती परवडेनासी झाली आहे. अनेक कारणांमुळे शेतकरी हतबल होत आहेत. शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत धान शेती फायदेशीर होण्यासाठी विविध पर्याय शोधले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून भातशेतीत यांत्रिकीकरण करणे आज काळाची गरज असून यांत्रिकीकरणाचा वापर शेतीत वाढल्यास धानशेती शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे असे मत भंडाराचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या वतीने भंडारा तालुक्यातील जाख येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहात यांत्रिकीकरण योजनेतून धान लागवडीसाठी यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण व श्री पद्धतीने धान लागवड प्रात्यक्षिके अधिकाऱ्यांतर्फे दाखवण्यात आली.यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, तंत्र अधिकारी आरे साहेब, गणेशपुर प्रोड्यूसर कंपनीचे डॉ. संजय एकापूरे, खर्शीपार मुख्यालयाचे कृषी सहाय्यक आनंद मोहतूरे, यांच्यासह जाख परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांशी बोलताना कृषी सहाय्यक आनंद मोहतुरे यांनी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणातून धान लागवड केल्यास बियाण्याची बचत होऊन आर्थिक तसेच वेळेची बचत झाल्याने उत्पादनात दुपटीने वाढ होत असून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. यावेळी यांत्रिकीकरण धान लागवडीची प्रात्यक्षिके दाखवली.प्रोडूसर कंपनीचे संजय एकापुरे यांनी ऐन खरीप हंगमात मजुरांचा भासणारा तुटवडा तसेच धान कापणीच्या वेळी ट्रॅक्टर सह मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी धान लागवड यांत्रिकीकरणाने करणार असल्याचे सांगितले.कृषी विभागाच्या वतीने प्रोडूसर कंपनीच्या मदतीने शासनाच्या विविध योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी मिळत असलेल्या कृषि विभाग व शेतकऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी परिसरातील शेतकरी तसेच स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे भंडारा तालुक्यातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.मजुरांच्या समस्येवर करता येणार मातकृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक लागवडीच्या तसेच पीक काढणीच्या वेळी मजुरांचा भासणारा तुटवडा यावर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाने धान लागवड केल्यास मजुरांच्या तुटवड्यावर मात करता येणार आहे. एकाच वेळी अनेक हेक्टर क्षेत्रावर रोवणी तसेच धानाची मशागत व धान कापणी करणे सहज शक्य असल्याने यांत्रिकीकरणाद्वारे धान लागवड केल्यास शेतकऱ्यांना मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे . त्यामुळे हा आधुनिक प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी जमा झाले होते.

टॅग्स :agricultureशेती