शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी चिकित्सालयातून साहित्यांची चोरी

By admin | Updated: August 28, 2014 23:35 IST

पालोरा आबादी येथे प्रशासकीय ३५ एकर असलेला कृषी चिकित्सालय आहे. आजही येथे अनेक कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ३५ एकरात पांढरा पढार पिकत आहे.

पालोरा (चौ.) : पालोरा आबादी येथे प्रशासकीय ३५ एकर असलेला कृषी चिकित्सालय आहे. आजही येथे अनेक कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ३५ एकरात पांढरा पढार पिकत आहे. येथील कर्मचारी रात्रीचा फायदा घेवून येथील साहित्याची चोरी करून भंगार दुकानदाराला विकत आहेत. अनेक साहित्य घरी नेवून ठेवले आहेत. अनेकदा भरदिवसा भंगार दुकानदाराला बोलावून खुलेआम हजारो रूपयाचे साहित्य विकले जात आहे. हा सर्व प्रकार लागूनच असलेले गावकरी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. मात्र येथील अधिकाऱ्याला हे दिसत नाही. कारण ते कार्यालयात उपस्थितच राहत नही. आठवड्यातून एकदा येवून पुर्ण दिवसाच्या सह्या करून मोकडे होत आहेत. येथील साहित्य चोरीचे प्रमाण वाढले आहे. कृषी कार्यालयाचे कोणतेही अधिकारी याकडे भिरकावून पाहत नाही. शासनाकडून शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर देण्यात आला. येथील कर्मचारी या ट्रॅक्टरचा दुरउपयोग करतानी दिसत आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझल टाकून घरची शेतीची मशागत करून किरायाने पाठवित आहेत. वेगवेगळे बिल काढून शासनाच्या तिजोरीला चुना लावण्याचा प्रकार येथे सुरू आहे. बाहेरून येणारे यात्रेकरू जेव्हा या कृषी चिकित्सालयाकडे पाहतात तेव्हा त्यांना हसू आवरत नाही. एकीकडे शासनाकडून सांगितले जाते की, भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारताची अर्थसंकल्पना ही शेतीवर आधारित आहे. शेतीचा उत्पादनात वाढ व्हावी म्हणून अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यात असे अनेक कृषी चिकित्सालय आहेत की ते राम भरोसे सुरू आहेत. (वार्ताहर)