शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

माती व शेणखताच्या बिलांची जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:10 IST

येथील वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवडीत गौडबंगाल असे वृत ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वनविभागात सावरासावर सुरु झाली.गाळयुक्त माती व शेणखताचे बिलांची जुळवाजुळव करण्यासाठी वनकार्यालयात श्निवारी एकच धावपळ सुरु होती.

ठळक मुद्देसंडे अँकर । तुमसर वनविभागात खळबळ, ३ लाख २८ हजार वृक्ष लागवडीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवडीत गौडबंगाल असे वृत ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वनविभागात सावरासावर सुरु झाली.गाळयुक्त माती व शेणखताचे बिलांची जुळवाजुळव करण्यासाठी वनकार्यालयात श्निवारी एकच धावपळ सुरु होती. गाळयुक्त माती व शेणखतांची येथे निविदा मागविण्यात आल्या होत्या, हे विशेष.तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत २१ साईट वर वृक्ष लागवड करायचे निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत ३ लाख २८ हजार वृक्ष लागवड येथे करण्यात आली. त्याकरिता ६ कोटी खर्च करण्यात आले. येथे ८ लाख २३ हजार ८२३ झाडांची लागवड करायचे आहे. वृक्ष लागवडीकरिता तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाने कंत्राटदाराकडून गाळयुक्त माती व शेणखतांच्या निविदा मागविल्या होत्या. गाळयुक्त माती तलावातून आणावयाची होती. कमी किमतीत पुरवठा करणाऱ्या स्थानिकांकडून गाळयुक्त माती व शेणखत पुरवठा करण्यात आला. स्थानिक लोकांकडून निविदा १ जून २०१९ रोजी जाहीरनामा काढून निविदा ए-वन फॉर्ममध्ये मागविण्यात आले होते. येथे तुलनात्मक तक्ता तयार करण्यात आला. त्यानंतर तुलनात्मक तक्ता भंडारा उपवन् मंजूरीकरिता सादर करण्यात आले.यात गाळयुक्त मातीसाठी ४ लाख १९ हजार तर शेणखतासाठी ११ लाख २० हजार मंजूर करण्यात आले. एकुण किंमत १५ लाख ३९ हजारांची मंजुरी प्रदान करण्यात आली. येथे शेणखत पुरेसे मिळाले नाही अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लुचे यांनी दिली.गाळयुक्त माती तलावातून काढण्यात आली असा कागदी पुरावा येथे आहे, परंतु नियमानुसार महसूल विभाग तथा तलावाची मालकी असलेल्या इतर विभागाकडून मंजुरीची टीपी येथे नाही.वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लुचे म्हणाले, शेणखत व गाळयुक्त मातीकरिता जाहीर सूचना करून ए-वन फॉर्ममध्ये बंद लिफाफ्यात निविदा मागविण्यात आली होती. सर्वात कमी दर असलेल्या स्थानिकांनी येथे शेणखत व पाखण माती पुरविली. तर काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे म्हणाले, शेणखत व पाखण माती येथे वृक्ष लागवड करताना उपयोग करण्यात आला नाही. गाळयुक्त माती आणल्याची येथे टीपी नाही. शेणखत उपलब्ध न झाल्याने रासायनिक खत घालण्यात आले. असे सांगण्यात येत आहे. वास्तविक येथे कागदोपत्री शेणखत व पाखणमाती घालण्यात आली आहे.मुल्यमापन समितीने केले मुल्यांकनवृक्ष लागवडीनंतर नागपूर येथील मुल्यमापन समिती येथे आली होती. त्यांनी मुल्यांकन केले होते. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लुचे यांनी दिली. मुल्यांकन समितीचे प्रमुख सीसीएफ दर्जाचे अधिकारी होते. त्यांनी केवळ कागदोपत्री मुल्यांकन केले काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात ५३.९९ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. सदर प्रकारामुळे वृक्ष लागवड मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वृक्ष लागवड करणारे मजुरांनी पाखण माती व शेणखताचा वापर चांदपूर बिटमध्ये केला नाहे असे सांगितले. त्यामुळे येथील वृक्ष लागवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.