दोन्ही आरोपींना अटक : करडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकरडी (पालोरा) : निलज येथील नातेवाईकांच्या घरून सासरी सुरेवाडा गावी जाण्यासाठी निघालेल्या गर्भवती विवाहितेवर दोन तरूणांनी सलग पाच दिवस अत्याचार केला. याप्रकरणी ९ जून रोजी करडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून भादंवि ३७६ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. दिलीप चोपडू शेंडे (२८) रा.आमगाव व तुषार गणेश शेंडे (२२) रा.पचखेडी ता.भंडारा अशी आरोपींची नावे आहेत.पीडित तरूणी निलज येथील नातेवाईकाकडे पाहुणी म्हणून आली होती. सासरी सुरेवाडा येथे जाण्याचा आग्रह केल्यामुळे २८ मे रोजी तिच्या नातेवाईकाने दुचाकीने तिला करडी बसस्थानकावर सोडून दिले. तिथून बसने ती पालोरा येथे पोहोचली. पालोरा बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना दिलीप शेंडे व तुषार शेंडे या दोघांनी दुचाकीवर बसवून तिला आमगाव (दिघोरी) येथे नेले. दोघांनी तिच्यावर सलग पाच दिवस आमगाव व कोका जंगलात अत्याचार केले. दोन्ही आरोपी विवाहित आहेत. पीडित तरुणीचे वर्षभरापूर्वी लग्न झाले असून ती गर्भवती आहे. त्यानंतर तिने ९ जून रोजी करडी पोलिसात तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. तपास करडीचे ठाणेदार प्रभाकर बोरकुटे करीत आहेत. (वार्ताहर)
गर्भवती विवाहितेवर सामूहिक अत्याचार
By admin | Updated: June 10, 2016 00:31 IST