शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

विवाहितेच्या खुनाचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:29 IST

घरी एकट्या असलेल्या विवाहितेचा खून झाल्याची घटना पवनी येथील बेलघाटा वॉर्डात मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आले. या खुनाचे गुढ कायम असले तरी विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पवनी पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपवनीतील घटना : पतीसह पाच जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : घरी एकट्या असलेल्या विवाहितेचा खून झाल्याची घटना पवनी येथील बेलघाटा वॉर्डात मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आले. या खुनाचे गुढ कायम असले तरी विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पवनी पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.ज्योत्स्ना गणेश जुमळे (३०) रा.बेलघाट वॉर्ड पवनी असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पती गणेश रामदास जुमळे आपल्या घरी परत गेला तेव्हा पत्नी मृतावस्थेत आढळून आली. तिचा खून झाल्याचे लक्षात आले. रात्रीच पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. दरम्यान बुधवारी ज्योत्स्नाचा भाऊ गोकुळदास काटेखाये (४३) रा.खातखेडा यांनी या प्रकरणी संशय व्यक्त करीत तक्रार दिली.त्यावरून पोलिसांनी पती गणेश रामदास जुमळे (३५), उमेश रामदास जुमळे (३०), मंगेश रामदास जुमळे (२८), चिंधाबाई रामदास जुमळे (५५) आणि रामदास जुमळे (६०) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.दरम्यान खुनाचे गुढ कायम असून नेमका खून कशासाठी झाला याचा शोध घेण्यासाठी श्वानपथक आणि फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या घटनेने पवनी शहरात खळबळ उडाली असून रात्री बेलघाटा वॉर्डात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.नागपुरात उत्तरीय तपासणीज्योत्स्ना जुमळे हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पवनी येथे करण्यास नातेवाईकांनी मनाई केली. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन करावे अशी मागणी केली. त्यावरून मृतदेह नागपूर येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.पवनीच्या तरुणाची विहिरगावात शस्त्राने हत्यापवनी येथील प्रसिद्ध ग्राफीक्स डिझायनरची नागपूर जिल्ह्यातील विहिरगाव येथे धारदार शस्त्राने हत्या करण्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. संजय धनराज चव्हाण (३५) असे मृताचे नाव आहे. तो गत काही वर्षांपासून डिझायनिंगच्या कामानिमित्ताने नागपूर जिल्ह्यातील विहिरगाव येथे आपल्या पत्नी व मुलासह राहत होता. मंगळवारी रात्री तो राहत असलेल्या फ्लॅटवर त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या संदर्भात नागपूर पोलिसांनी एका संशयीत इसमाला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. दरम्यान दुपारी शवविच्छेदनानंतर संजयचे पार्थिव पवनी येथे आणण्यात आले. चव्हाण कुटुंबिय पवनी येथील तुकडोजी वॉर्डात वास्तव्यास आहेत. संजय चव्हाण यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई, वडील असा आप्तपरिवार आहे. २४ तासात घडलेल्या खुनाच्या दोन प्रकरणाने पवनी शहर हादरून गेले आहे. शांतताप्रिय शहर म्हणून ओळख असलेल्या पवनी शहराला कुणाचे ग्रहण लागले अशी चर्चाही होऊ लागली आहे. संजयच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे मात्र कळू शकले नाही.