शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बडेजावाला फाटा देत साध्या पद्धतीने विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : लग्न म्हटले की, बडेजाव आलाच. आपली प्रतिष्ठा लग्न सोहळ्यातून दाखविण्याची चढाओढ लागलेली असते. कर्जबाजारी ...

ठळक मुद्देडॉक्टर जोडप्याचा आदर्श : स्वागत समारंभाच्या खर्चातून उभारणार ग्रंथालय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्न म्हटले की, बडेजाव आलाच. आपली प्रतिष्ठा लग्न सोहळ्यातून दाखविण्याची चढाओढ लागलेली असते. कर्जबाजारी होऊ परंतु लग्न धूमधडाक्यात करू अशी मानसिकता सर्वत्र दिसते. मात्र या सर्व बाबींना फाटा देत एका डॉक्टर जोडप्याने अगदी साध्या पद्धतीने ते ही नोंदणी विवाह करून समाजापुढे आदर्श ठेवला. डॉ. प्रताप अर्जून गोंदुळे आणि डॉ. रोशनी सुधाकर राऊत असे या डॉक्टर दांपत्याचे नाव आहे.मोहाडी तालुक्यातील रोहणा येथील डॉ.प्रताप मुंबई येथे बालरोग तज्ज्ञ आहे. एमबीबीएस बीसीएस झालेल्या डॉ.प्रताप यांची नाळ आजही गावाशी जुळली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात नोकरी करीत असताना आणि उच्च शिक्षित असतानाही त्यांनी रूढी परंपरा आणि रितीरिवाजांना बाजूला सारत नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांना साथ दिली ती त्यांची अर्धांगिनी डॉ.रोशनी यांनी. रोशनी या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील सुधाकर राऊत यांची कन्या. बीएएमएस एमडी असलेल्या रोशनी यांनी डॉ.प्रताप यांच्या विचाराला उचलून धरले आणि तीही अगदी साध्या पद्धतीने विवाह करण्यास तयार झाली. सोमवार १५ जुलै रोजी भंडारा येथील नोंदणी कार्यालयात अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला.लग्नानंतर स्वागत समारंभ करावा अशी कुटुंबियांची इच्छा होती. परंतु लग्नावर खर्च टाळला आता स्वागत समारंभ कशाला असे म्हणत डॉ.प्रताप यांनी कुटुंबियांची समजूत काढली. स्वागत समारंभासाठी होणाऱ्या पैशातून गावात ग्रंथालय उभारण्याचा निर्णय घेतला. येथेही डॉक्टरांचा सेवाभाव दिसून आला. विशेष म्हणजे लग्नाच्या पत्रिकेतूनही त्यांनी सामाजिक प्रबोधन केले. बेटी बचाव चा संदेश देणारा लोगो आणि स्वच्छ भारत अभियान, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश त्यांनी आपल्या साध्या पत्रिकेतून दिला. देव-देवतांच्या फोटोऐवजी त्यांनी वृक्षाचे फोटो आणि स्वच्छ भारत मिशनचा गांधीजींचा चष्मा त्यावर मुद्रित केला. असा हा आगळा वेगळा सोहळा भंडारा जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय आहे. या सोहळ्यातून अनेकांनी आदर्श घ्यावा आणि विवाहावर होणारा अनावश्यक खर्च टाळावा, अशी अपेक्षा आहे.अवाजवी खर्च करून काही साध्य होत नाहीनोंदणी पद्धतीने विवाह आटोपल्यानंतर डॉ.प्रताप गोंदुळे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, निरर्थक आणि अवाजवी खर्च लग्नावर करून काहीच साध्य होत नाही. मी ज्या परिस्थितीत त्याची मला जाणीव आहे. समाजाला काहीतरी आपले देणे लागते. या भावनेतून स्वागत समारंभाच्या सोहळ्यातून आपण ग्रंथालय उभारणार आहे. त्या ठिकाणी जाऊन चार मुले मोठी झाली तर हीच देशाची खरी संपत्ती आहे. प्रतिष्ठेपेक्षा समाजहिताला प्रत्येकाने महत्व दिले तर देश निश्चितच प्रगतीचे पाऊल टाकेल यात शंका नाही, असे डॉ.प्रताप म्हणाले.