लाखोंची उलाढाल : सोने खरेदीची धूमभंडारा : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने-चांदीची जोरदार खरेदी केली. सोमवार आणि मंगळवारला सर्वच बाजारपेठा हाऊसफुल्ल होत्या. सराफा बाजारात सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी तर कपडा बाजारात कपडे खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दिवाळीत दोन दिवसात सर्वच बाजारपेठांमध्ये लाखोंची उलाढाल झाली. ग्राहकांची खरेदीसाठीची लगबग आणि दुकादारांची धावपळ, असा माहोल दिसत होता. मुख्य मार्गावरच्या बाजारपेठांमध्ये सोने, कपडे विक्रीत १५ टक्के वाढ आहे. सोमवारला शुद्ध सोन्याचे प्रतितोळा दर २६,५०० रुपये आणि एक किलो चांदीचे दर ३६,२०० रुपये होते. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव कमी होते. त्यामुळेच सोने खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिवसागणिक वाढत असल्याचे धनत्रयोदशीला झालेल्या विक्रीच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. ग्राहकांचा कल पाहून सराफांनी कमी वजनातील दागिन्यांची श्रुंखला बाजारात आणली आहे. गुंतवणूक म्हणून एक, दोन ग्रॅम सोन्याची खरेदी करतात. सोमवारला कमी वजनातील दागिन्यांना मागणी होती. अनेकांनी आॅर्डर देऊन दागिने लक्ष्मीपूजनाला नेण्याचे बेत आखले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
बाजारपेठा हाऊसफुल्ल
By admin | Updated: November 11, 2015 00:28 IST