शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती निवडणूक; भंडाऱ्यात राष्ट्रवादी व भाजपा समर्थित महाआघाडीने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2023 19:33 IST

Bhandara News भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे गट समर्थीत महाआघाडीने काँग्रेसच्या गटाला खिंडार पाडीत सत्ता मिळविली. सभापतीपदी भाजपाचे विवेक नखाते तर उपसभापतीपदी शिंदे गटाचे नामदेव निंबार्ते विजयी झाले.

भंडारा : सोमवारला झालेल्या भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे गट समर्थीत महाआघाडीने काँग्रेसच्या गटाला खिंडार पाडीत सत्ता मिळविली. सभापतीपदी भाजपाचे विवेक नखाते तर उपसभापतीपदी शिंदे गटाचे नामदेव निंबार्ते विजयी झाले. बंडखोरी करीत विवेक नखाते यांनी भाजपात प्रवेश करीत सभापतीपद मिळविल्याने काँग्रेस गोटात निराशेचे वातावरण पहावयास मिळाले.भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने १८ पैकी सर्वाधिक ९ जागा जिंकल्या होत्या.

महाआघाडीने ६ जागा तर अपक्षांनी तीन जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीनंतर तिन्ही अपक्षांनी महाआघाडीला समर्थन दिल्याने ९ विरूद्ध ९ असे संख्याबळ झाले होते. बहुमतासाठी दोन्ही गटाला एका संचालकाची गरज होती. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होण्याचे संकेत सुरूवातीपासून होते. परंतु निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी काँग्रेसच्या गटातील विवेक नखाते यांनी सभापतीपदासाठी बंडखोरी करीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसचे स्वप्न् धुळीस मिळाले. निवडणूक निकालातही तेच चित्र दिसून आले.

बाजार समितीच्या सभागृहात सभापती पदासाठी काँग्रेसचे रामलाल चौधरी यांनी अर्ज भरला. त्यांचे सूचक रमन नरडंगे तर अनुमोदक सुखराम अतकरी होते. भाजप गटातून सभापती पदासाठी विवेक नखाते यांचे अर्जाला सूचक जयराम वंजारी तर अनुमोदक हितेश सेलोकर होेते. निवडणुकीत विवेक नखाते यांना १० मते तर रामलाल चौधरी यांना ८ मते मिळाली. उपसभापतीपदासाठी काॅग्रेस गटातून नितीन कडव यांचे अर्जाला सूचक पुष्पमाला मस्के तर अनुमोदक कृष्णा अतकरी होेते. महाआघाडीतून उपसभापतीपदासाठी नामदेव निंबार्ते यांचे अर्जाला सूचक नरेंद्र झंझाड तर अनुमोदक विजय लिचडे होते. नामदेव निंबार्ते यांना १० तर नितीन कडव यांना ८ मते मिळाली. निवडणुकीनंतर गुलालाची उधळण करीत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

जिल्हा उपनिबंधक तथा प्राधिकृत अधिकारी शुद्धोधन कांबळे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. त्यांना मुख्य लिपीक निलेश जिभकाटे व कृषी बाजार समितीचे सचीव सागर सार्वे यांनी सहकार्य केलेे.

टॅग्स :Electionनिवडणूक