शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

रमजान ईदसाठी सजला शहरात बाजार

By admin | Updated: July 13, 2015 00:49 IST

रमजान ईद अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये तयारीची लगबग सुरू झाली आहे.

सेवई व खजूरसह अन्य पदार्थांची रेलचेल : खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी भंडारा: रमजान ईद अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये तयारीची लगबग सुरू झाली आहे. शहरातही ईदेचा बाजार सजला आहे. शेवया, घिवर, फेण्या, खजूर आणि तत्सम साहित्याची दुकाने सजली आहेत. मुस्लीम बांधव सहकुटुंब बाजारात जाऊन विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.मानवी जीवनातील धार्मिक श्रद्धा व परंपरांना विवेकी विचारांची जोड देऊनच पूर्वजांनी अनेक पूजा विधींची निर्मिती केली. यातील अनेक परंपरा आजही मानवाच्या प्रगतीला पोषकच ठरल्याचे दिसून येतात. सर्वधर्मसमभावाची कास धरणाऱ्या या देशात इस्लाम धर्मीर्यांनी देखील हीच विवेकाची परंपरा सुरू ठेवली. रमजान महिन्याच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. रोजा म्हणजे मराठी भाषेत उपवास होय. रोजा हा शारीरिक, मानसिक व आत्मशुद्धीसाठी उपयुक्त असतो. दिवसभर काहीही सेवन न करता उपवास केल्याने शरीरातील उष्णता वाढून मेद धातूचे पचन होते. त्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबीचे प्रमाण कमी होऊन शरीरशुद्धी होण्यास मदत मिळते. महिनाभर रोजा, नमाज व जकात अदा केल्यास काया, वाचा व मनइंद्रिये शुद्ध होऊन पवित्रता लाभते. मानवातील चांगल्या गुणांची वृद्धी होऊन जीवन यशस्वी होते. म्हणूनच इस्लाममध्ये रोजाला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे. रोजाच्या काळात सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत खान-पान, चुकीच्या गोष्टी ऐकणे, पाहणे आदी धर्मबाह्य मानले जातात. एका अर्थाने आदर्श जीवन जगण्यासाठी मुस्लीमबांधव व्रतबंधन पाळतात. रमजान महिन्यातील २४ तासांचा प्रत्येक दिवस जणू प्रशिक्षणच असल्याचे मानले जाते. त्यानंतर नमाज फजर, जोहर व असरनंतर मागरिब केला जातो. त्यानंतरच रोजा सोडतात. ईशा आणि तराबीची नमाजही पठण करतात. सात वषार्पासून तर वयोवृद्धापर्यंत हा रोजा केला जातो. रोजा सोडणाऱ्याकरिता मस्जिद परिसरात विविध समित्यांकडून सोईसुविधा उपलब्ध करून दिले जाते. घरोघरी कुराणाचे पठणही होते. (नगर प्रतिनिधी)