शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दंडाच्या भीतीने अनेकांनी काढले कुलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

सगळीकडे कोरोना विषाणूने थैमान घातले असून लॉकडाऊनमुळे जगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत वातावरणातील तापमान बदलाने उन्ह तापू लागले आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने साकोली, सेंदुरवाफा येथील नागरिकांनी लहान, मोठे कुलर घराबाहेर लावले. मात्र, कुलर लावल्यामुळे घरात थंडावा आल्याने बाहेर फिरणारे दिवसा घराच्या आत राहत आहे.

ठळक मुद्देसाकोलीत अफवांना ऊत : समस्यांचे निराकरण करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : घराबाहेर कुलर लावण्यास नगरपरिषदेतर्फे दंड वसूल करण्यात येईल, अशी अफवा शहरात पसरल्याने साकोलीतील नागरिकांनी आपआपल्या घरात लावलेले कुलर काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, ही अफवा असून कुणीही कुलर काढू नये, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केल्याने धास्तावलेल्या नागरीकांना दिलासा मिळाला आहे.सगळीकडे कोरोना विषाणूने थैमान घातले असून लॉकडाऊनमुळे जगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत वातावरणातील तापमान बदलाने उन्ह तापू लागले आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने साकोली, सेंदुरवाफा येथील नागरिकांनी लहान, मोठे कुलर घराबाहेर लावले. मात्र, कुलर लावल्यामुळे घरात थंडावा आल्याने बाहेर फिरणारे दिवसा घराच्या आत राहत आहे. याच काळात नगरपरिषदेतर्फे गावात कचरा फेकणारे, नाली बुजविणारे, अनावश्यक फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, परवाना न घेता दुकान, व्यापार करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. परंतु, नागरिकांनी घराबाहेर लावलेले कुलर लवकरात लवकर काढून टाकावे अन्यथा नगरपरिषदेकडून कुलर जप्त करण्यात येईल व दोन ते पाच हजारपर्यंत दंड करण्यात येईल, अशी अफवा शहरात पसरली. या अफवेमुळे नागरिकांनी बाहेर लावलेले कुलर घराच्या आत लावण्यास सुरुवात केली.बाहेर लावलेल्या कुलरसंबंधात विविध प्रकारच्या अफवेमुळे नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी कोंडीत सापडले आहेत. मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे नाव सांगून जे लोक बाहेर कुलर लावतील त्यांचे कुलर जप्त करून दंड वसूल करण्यात येईल. काही लोकांचे मुख्याधिकाऱ्यांनी कुलर जप्त केले व काही लोकांकडून दंड घेतला तर काहींवर गुन्हे दाखल केले, अशा अफवांना पेव फुटले आहे.अशा अफवा पसरल्याने नागरिक धास्तावले असून दंडापोटी बऱ्याच लोकांनी आपले कुलर बाहेरून काढून घराच्या आत लावले. याबाबत मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्याशी चर्चा केली असता कुणीही अफवेवर विश्वास ठेऊ नये, कुलर बाहेर लावण्यासाठी नगरपरिषदेकडून कोणतेही आक्षेप नाही व परवानगीची आवश्यकता नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, कुठलीही माहिती नगरपरिषदेत स्वत:येऊन किंवा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून समस्येचे निराकरण करावे, असे सांगितले. अलीकडे साकोलीत विविध प्रकारचे दुकाने उघडणार असल्याच्या अफवा आहेत.काही समाजकंटक संचारबंदीचा फायदा घेत माझ्याविरुद्ध षड्यंत्र रचून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये. अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल.- माधुरी मडावी,मुख्याधिकारी नगरपरिषद, साकोली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या