शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘साकोली के सितारे’ने जोपासली माणुसकी

By admin | Updated: June 13, 2017 00:16 IST

सध्या व्हॉट्सअपचे जाळे सर्वत्र पसरले आहे. लहानापासून तर वयोवृध्दापर्यंत या व्हॉट्सअपचा मोहात सापडले आहेत.

साकोलीवासीयांचा स्त्युत्य उपक्रम : अनाथ मुलींना ५५ हजार रुपयांची मदत संजय साठवणे । लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सध्या व्हॉट्सअपचे जाळे सर्वत्र पसरले आहे. लहानापासून तर वयोवृध्दापर्यंत या व्हॉट्सअपचा मोहात सापडले आहेत. एरव्ही हा सर्व टाईमपास म्हणून समजला जाणारा व्हॉट्सअप कधीकधी कुणाच्या आयुष्याचा आधार बनतो. असाच प्रकार साकोली येथे पाहायला मिळाला. साकोली के सितारे या ग्राममधील सर्वांनी जमेल तशी वर्गणी गोळा करीत अनाथ मुलींना ५५ हजार रुपयांची आर्थिक मदत करुन साकोली के सितारे या नावाप्रमाणेच सिताऱ्याप्रमाणेच चकुन माणुसकी दाखवुन दिली.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगांव येथील नाभीक समाजातील सुर्यवंशी कुटुंबीयांवर संकट कोसळले. अशी बातमी साकोली के सितारे या व्हॉटस्अप ग्रृपवर वाचायला मिळाली. ही बातमी वाचल्यावर खरोखरच प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रु निघाले. सुर्यवंशी दाम्पत्यांच्या २५ दिवसातच मृत्यू झाला. या दाम्पत्यांच्या ४ लहान मुली अनाथ झाल्या होत्या. या बातमीची प्रतयक्षात निमगाव येथे जाऊन चौकशी केली व लगेच मदतीसाठी सर्व सदस्यांचे हात समोर आले व तब्बल ५५ हजार रुपयांची मदत त्या चारही मुलींच्या स्वाधीन केली. त्यामुळे या साकोली के सितारे या व्हॉटस्अप ग्रृपला इइंसानीयत के सितारे असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.यावेळी डॉ. अजय तुमसरे, अखिलेश गुप्ता, नरेंद्र वाडीभस्मे, ओम गायकवाड, रुपेश खेडीकर, विष्णु रणदिवे, मुशीर खान, अमोल हलमारे, डॉ. येळे, जगदीश सुर्यवंशी उपस्थित होते.