शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे मनोहर सिंगनजुडे यांचे निधन

By admin | Updated: June 6, 2017 00:20 IST

भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे कार्यकारी अध्यक्ष तथा भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर गणपतराव सिंगनजुडे यांचे सोमवारी सकाळी ११.४५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे कार्यकारी अध्यक्ष तथा भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर गणपतराव सिंगनजुडे यांचे सोमवारी सकाळी ११.४५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ, एक बहिण व नातवंड असा आप्त परिवार आहे. खरबी येथील निवासस्थानी सोमवारला सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. एका परिचिताला सोबत घेऊन स्वत: चारचाकी चालवित ते तुमसर येथील डॉ.गादेवार यांच्या रूग्णालयात पोहोचले. तिथे उपचारा दरम्यान हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांची प्राणज्योत मालविली.खरबी येथील सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाल्यानंतर मनोहर सिंगनजुडे हे खरबीचे सरपंच बनले. १९९९ ला खापा जिल्हा परिषद गटातून विजयी झाले. २००४ मध्ये राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्य बनले. २००४ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.सन २००५ मध्ये तुमसर विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली होती. २०१६ मध्ये भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्याशी जवळीक असल्यामुळे २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या नऊ सदस्य संख्या बळावर पटेलांनी त्यांना अध्यक्ष केले होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारला सकाळी ९ वाजता माडगी स्मशानघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांचे ते मोठे बंधू होत.