शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

३१ गावांचा कारभार एका गटसचिवाच्या खांद्यावर

By admin | Updated: May 19, 2014 23:14 IST

मोहाडी तालुक्यातील येत असलेल्या ११ सोसायट्या, ३१ गांवे व २ बँकेचा कारभार एका गटसचिव साभांळत असल्याचे दिसून येत आहे.

जांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील येत असलेल्या ११ सोसायट्या, ३१ गांवे व २ बँकेचा कारभार एका गटसचिव साभांळत असल्याचे दिसून येत आहे.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना खरीब, रबी पिकाच्या लागवडीकरिता व इतर कामाकरिता जिल्हा मध्यवर्ती बँकेतून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या समितीच्या शिफारशीने शेतकर्‍यांना कर्ज वाटप करीत असतो. या सर्वांचा लेखा जोखा त्या सोसायटीच्या गटसचिव सांभाळत असतो.

तालुक्यात येत असलेल्या शिवणी, आंधळगाव, वडेगाव, पालडोंगरी, सकरला, जांब, धोप, कांद्री, हिवरा, सालई, ताळगाव अशा ११ सोसायटीमध्ये शिवणी, अकोलाटोला, टोला, आंधळगाव, मलिदा, वडेगाव, पालडोंगरी, सकरला, खैरलांजी, जांब, देऊळगाव, बेटेखारी, धोप, कांद्री, बोंद्री, नवेगाव, धुसाळा, घोरपड, वाडा, फुटाळा, पांजरा, हिवरा, वासेरा, सालई, सिहरी, नागठाणा, ताळगांव अशा ३१ गावांचा समावेश आहे.

३१ गावातील शेतकर्‍यांना कर्ज देणे वसुली घेणे व इतर कामे या संस्थेच्या गटसचिवाला करावी लागतात. या ३१ गावांचा कारभार गटसचिव ए. एस. गायकवाड हे सांभाळत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी ११ सोसायट्यांमध्ये सहा गटसचिव काम सांभाळत होते.

परंतु पाच गट सचिव सेवानवृत्त झाल्याने ११ सोसायटीचा भार एकट्या गटसचिवावर आल्याने त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मानसिक त्रास उद्भवत आहे.

तसेच ३१ गावाकरिता एकच निरीक्षकसुध्दा आहे. एवढे असूनसुध्दा गटसचिव आपल्या कामामध्ये कोणतीही कमतरता भासू देत नाही. तरीसुध्दा सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी व पदाधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन गटसचिव जागेच्या रिक्त अनुशेष त्वरित भरण्याची गरज निर्माण झालेली आहे. (वार्ताहर)