शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छंदी मनाचा कलदार माणूस हरपला

By admin | Updated: April 9, 2017 00:28 IST

पूर्व विदर्भात मराठी वाचन संस्कृतीला आणि साहित्य अभिरूचीला समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व ही प्रा.कृष्णा चौधरी यांची खरी ओळख होती.

विदर्भ साहित्य संघाचा कार्यक्रम : प्रा.कृष्णा चौधरी यांना श्रद्धांजलीभंडारा : पूर्व विदर्भात मराठी वाचन संस्कृतीला आणि साहित्य अभिरूचीला समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व ही प्रा.कृष्णा चौधरी यांची खरी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे एक श्रेष्ठ वाड:मयसेवक व स्वच्छंदी मनाचा कलदार माणूस गमावला आहे, अशी शोकसंवेदना भंडारा येथे कृष्णा चौधरी यांच्या श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा, युगसंवाद वाङ्मयीन व सांस्कृतिक संस्था व सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात प्रा.कृष्णा चौधरी यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे हे होते.यावेळी प्रमोदकुमार अणेराव म्हणाले, कृष्णा चौधरी हे सभोवतीच्या जीवनाची व साहित्यातील सौंदर्याची मीमांसा करणारे एक गंभीर समीक्षक होते. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी साहित्यातील एक व्यासंगी व तरल प्रतिभेचे श्वेतकमळ निमाले आहे. अमृत बन्सोड म्हणाले, फुले-आंबेडकरी चळवळीतील प्रा.कृष्णा चौधरी यांच्या सहभागाच्या आठवणी सांगितल्या. डॉ.अनिल नितनवरे म्हणाले, वाङ्मयाच्या आणि मराठी अध्यापनाच्या साधनेसाठी आपल्या आयुष्याचे मोल देणारा मन:पूत शैलीने जगलेला एक कलदार माणूस म्हणजे कृष्णा चौधरी होते.समारंभाध्यक्ष डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी विदर्भातील वाङ्मय प्रसाराच्या क्षेत्रातील कृष्णा चौधरींच्या कर्तृत्वाचा मागोवा घेतला. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात निखळ वाङ्मयीन, सांस्कृतिक विचारमंथन घडविणारी एक व्याख्यानमाला प्रा.कृष्णा चौधरी यांच्या स्मरणार्थ सातत्याने राबविणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले.शोकसभेच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेचे संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी केले. यावेळी प्रा.राकेश रामटेके, बासप्पा फाये, घनश्याम कानतोडे, खोब्रागडे, साखरवाडे, सार्वजनिक वाचनालय, विदर्भ साहित्य संघ व युगसंवादाचे कार्यकारी सदस्य उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)