शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

पाणीसाठ्याचा योग्य विनियोग करा

By admin | Updated: August 17, 2016 00:13 IST

शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा सकारात्मक परिणाम जिल्हयात दिसून येत असून ...

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण : दीपक सावंत यांचे प्रतिपादनभंडारा : शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा सकारात्मक परिणाम जिल्हयात दिसून येत असून जलयुक्त शिवारमुळे जिल्हयात ११ हजार टिसीएम पाणीसाठी निर्माण झाला आहे. या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले, ते स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदिपकुमार डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर उपस्थित होते. सन २०१५ मध्ये जलयुक्त शिवार अभियानामधील कामावर प्रत्यक्षात ११ हजार ६६२ टिसीएम पाणीसाठानिर्माण झाला आहे. या कामामुळे जिल्हयात १२ हजार ३०२ हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता तयार झाली असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगाम २०१६-१७ करीता जिल्हयात एकूण ३७ हजार ६५० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यापैकी ३९ हजार ८४१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. खरीप हंगामासाठी जिल्हयात ७४ हजार ४०० मेट्रीकटन खतांचे आवंटन मंजूर असून जिल्हयात ४० हजार मेट्रीकटन खत उपलब्ध झाले आहे. जिल्हयात बियाणे व खताची उपलब्धतामुबलक असून याचा काळाबाजार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने २८८ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. या वर्षी दुष्काळ घोषित केलेल्या ३७१ गावांमधील ५ हजार ५९४ शेतकऱ्यांच्या २३ कोटी ९८ लाख रूपयांच्या कजार्चे रुपांतरण करण्यात आले आहे. तसेच यातील ४ हजार ६६ शेतकऱ्यांना १७ कोटी २२ लक्ष रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये ५७ धान खरेदी केंद्रांना मंजूरी मिळाली होती. त्यानुसार मुदतीत धान खरेदी झाली आहे. जिल्हयात एकूण २७ हजार ९७४ शेतकऱ्यांकडून १० लाख ६० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. त्यासाठी १७० कोटी ८० लाखांचे चुकारे अदा केले आहेत. खरेदी केलेल्या धानापैकी ९ लाख १४ हजार क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. या वर्षात भंडारा जिल्हयाला १५७१ कृषी पंपांना विज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट होते. मार्च २०१६ अखेर२ हजार ६९९ कृषी पंपांना विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे. या वर्षी १ते ७ आॅगस्ट या दरम्यान जिल्हयात महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानात महिलांची तसेच जनतेची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी उपविभागीयस्तरावर ३ व ग्रामस्तरावर १४६ महिला मेळावे आयोजित करण्यात आले. या मेळाव्यातून महिलांना शासकीय योजनांच्या माहिती सोबतच २ हजार ३५१ विविध दाखले वितरित करण्यात आले. या सोबतच इंदिरा गांधी निराधार योजनेचे ४९ तर कौटूंबिक अर्थसहाय्य योजनेचे १४९ धनादेश वाटप करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये राबविण्यात येणा?्या चिरंजीव योजनेच्या धर्तीवर राज्यातही चिरंजीव योजना राबविण्यात येणार आहे. राज्यातील ज्या जिल्हयामध्ये माता मृत्यु आणि अर्भक मृत्युंचे प्रमाण जास्त आहे. तेथे ही योजना प्राधान्याने राबविण्यात येणार आहे.महिलांची प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांना दर १०० प्रसुतीमागे ४ लाख रुपये देण्यात येणार असून ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. राजीव गांधी जिवनदायी योजनेतील करार नोव्हेंबर २०१६ मध्ये संपुष्टात येणार असून त्यानंतर ही योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणून ओळखली जाणार आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये ४ हजार ८०० लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून आतापर्यत १हजार ८८५ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासाठी आतापर्यंत ३ कोटी २७ लाख रुपये संबंधीत रूग्णालयांना शासनाकडून वितरित करण्यात आले आहेत. मरणोपरांत अवयवदानासाठी स्वंयस्फूतीर्ने नोंदणीे जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये करावे, असे आवाहन त्यांनी केले. जननी सुरक्षा योजना याअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये ५ हजार ३७८ मातांना लाभ देण्यात आला आहे. त्याचबरोबर जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमातंर्गत माता व नवजात अर्भकांना शासकिय रुग्णालयातून वाहन व्यवस्था, औषधोपचार, तसेच प्रयोगशाळेतील तपासण्या विना शुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्हा परिषद मार्फत सुध्दा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा योजना शहरी व ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविली जात असून २०१५-१६ या वर्षाकरीता ७ हजार ७९५ लाभार्थ्यांना १ कोटी ८ लाखाचे वाटप करण्यात आले आहे. या पुढेही या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना देण्यात येईल. सन २०१५-१६ मध्ये प्रसुती मातांना दवाखान्यात आणि प्रसुतीनंतर त्यांच्या घरी सेवा देण्यात आाली आहे. भंडारा जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून या वर्षाअखेर जिल्हयात ५९ हजार वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या १५१ ग्रामपंचायती हांगणदारीमुक्त झाल्या असून ८ हजार ८०० वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील ११ हजार ४०० लाभार्थ्यांना ३४२ कोटीचे गोसेखुर्द विशेष पॅकेज अंतर्गत वाटप करण्यात आले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील १२८ वाढीव कुटूंबांना ३ कोटी ७१ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. चालु आर्थिक वर्षात १ लक्ष ९१ हजार मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. यासाठी ८० कोटी २ लक्ष रुपये मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी विभागाचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)