शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्र वैभवशाली करणारी पिढी घडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:09 IST

विद्यार्थ्यांना समाज आणि शाळेतून जे संस्कार मिळतात त्या आधारावर विद्यार्थी घडत असतो, विद्यार्थी हा मेणाचा गोळा आहे. त्याला आपण शिक्षकांनी योग्य संस्कार देणे आवश्यक आहे. राष्ट्र वैभवशाली करणारी पिढी घडावी, असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी माधव फसाटे यांनी केले.

ठळक मुद्देमाधव फसाटे : लाखनीच्या समर्थ प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : विद्यार्थ्यांना समाज आणि शाळेतून जे संस्कार मिळतात त्या आधारावर विद्यार्थी घडत असतो, विद्यार्थी हा मेणाचा गोळा आहे. त्याला आपण शिक्षकांनी योग्य संस्कार देणे आवश्यक आहे. राष्ट्र वैभवशाली करणारी पिढी घडावी, असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी माधव फसाटे यांनी केले.राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित समर्थ प्राथमिक, समर्थ बालक मंदिर आणि श्री समर्थ कॉन्व्हेंट, लाखनी येथील चार दिवसीय स्नेहसंमेलनाचे बुधवारपासून आयोजन करण्यात आले. स्रेहसंमेलनाच्या उद्घाटकीय कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर होते. यावेळी अतिथी म्हणून संध्या हेमणे, शीला रहांगडाले, मधुकर लाड, प्रा. आनंदराव खोलकुटे उपस्थित होते.माधव फसाटे म्हणाले, जे आपण पेरू तेच उगवेल म्हणून उद्याचा आपला देश सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक घडवावा असे वाटत असेल, तर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करावे लागतील. स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांचे उपजत गुण या व्यासपीठावर प्रदर्शित करणे यासाठी स्नेहसंमेलन होणे आवश्यक आहे.संध्या हेमणे यांनी विद्यार्थ्यांना गोष्टी रूपातून कथा सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शारीरिक कवायती व योगासने यांचे प्रात्यक्षिके करण्यात आले. शाळेचे अहवाल वाचन विद्यार्थी प्रमुख एकांत थानथराटे व दीप्ती निखाडे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने पालकांची उपस्थितीत होती.११ जानेवारीला डॉ. सोनाली भांडारकर, जितेंद्र फसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्नेहसंमेलन संयोजकांनी केले. यावेळी मुख्याध्यापक डू. शं. भांडारकर, मंगेश मरसकोले, वनिता माटे, ज. शि. निखाडे, बालक मंदिर प्रमुख उमा आगाशे, कॉन्व्हेंट प्रमुख प्राची धरमसारे उपस्थित होते.