शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर १५ दिवसात निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:48 IST

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन संदभार्तील मागण्यासंदर्भात आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा करुन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी ......

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन संदभार्तील मागण्यासंदर्भात आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा करुन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात येऊन १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. या यशस्वी चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.हैद्राबाद हाऊस नागपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी तसेच आमदार बच्चु कडू व विभागीय आयुक्त अश्विन मुदगल, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे तसेच महसूल व जलसंपदा विभागांच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांच्या पूनर्वसनासंदर्भात तसेच रस्ते वीज पाणी आदी संदभार्तील प्रश्न सोडविण्याला अनुकुलता दर्शवून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नासंदर्भात प्रकल्पग्रस्त व जलसंपदा तसेच संबंधीत विभागांच्या अधिकाºयांची समिती गठित करुन या समितीच्या शिफारसीनुसार येत्या १५ दिवसात प्रश्न सोडविण्यात येतील, ही प्रमुख मागणी मान्य करण्यात आल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन मागे घेत असल्याचे आमदार बच्चु कडू यांनी जाहीर केले. गोसेखुर्द प्रकल्पासंदभार्तील पूनर्वसन झालेल्या गावात नागरी सुविधा पुरविणे तसेच प्रकल्पातील जलसाठ्यामुळे शेतीसह इतर वाहतुकीचे प्रश्न सुटेपर्यंत प्रकल्पातील जलसाठा एक मीटरपर्यंत कमी करण्याबाबतही यावेळी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.गोसेखुर्द प्रकल्पातील बाधित गावांपैकी काही गावांचे पूनर्वसन झाले आहे व काही गावांचे पूनर्वसन अद्याप बाकी आहे. अशा गावांचे पूनर्वसनाचे प्रश्न सुटेपर्यंत त्यांना आवश्यक सुविधा देण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी बारा मागण्या सादर केल्या होत्या. या मागण्या सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी तसेच अधिकाºयांची समिती गठीत करण्यात येऊन ही समिती प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन त्यांच्या प्रश्नांसंदर्भात सूचना करणार आहेत.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प