शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बालपणापासून मुलांना संस्कारक्षम बनवा

By admin | Updated: October 7, 2015 01:49 IST

बाळ जन्माला आल्यानंतर त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. मात्र त्या बाळात संस्कार घडविले जात आहेत की नाही याची काळजी घेतली जात नाही.

स्वामी नरेंद्राचार्य महाराज : ४० हजार अनुयायांनी घेतला दर्शनाचा लाभसंजय साठवणे साकोलीबाळ जन्माला आल्यानंतर त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. मात्र त्या बाळात संस्कार घडविले जात आहेत की नाही याची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे लहानपणापासून मुलांना संस्कारक्षम बनविणे गरजेचे आहे. ही जबाबदारी आईवडीलांची जशी असते तसेच समाजाला संस्कारक्षम बनविण्याची जबाबदारी संतांची आहे, असे मत जगतगुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी दार्शनिक प्रवचनातून व्यक्त केले. साकोली येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या प्रांगणात आयोजित नरेंद्रचार्य महाराज यांचे प्रवचन व साधक दीक्षा सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, खा.पटोले यांच्या सहचारिणी मंगला पटोले, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी विनोद पटोले, सत्यवान हुकरे, विहीपचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजय एकापुरे, राहुल चव्हाण, गीता कापगते उपस्थित होते. यावेळी खा.पटोले यांनी महाराजांचे सपत्नीक स्वागत केले. तत्पूर्वी महाराजांचे स्वागतगीताने स्वागत करण्यात आले. सामाजिक उपक्रमातंर्गत अपंग बांधवांना ट्रायसिकल तर शेतकऱ्यांना पिकांवर औषधी फवारणीचे यंत्र अतिथींच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी नरेंद्राचार्य महाराज म्हणाले, संत आणि आईमध्ये जास्त फरक नसतो. म्हणूनच संतांना मायबाप म्हणतात. आई मुलांचे लाड करते तर वडील मुलांना शिकवून वळण लावतात. आजच्या युगात महिलांची कुचंबणा होत आहे. समाजात मातृत्त्वाबद्दल जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. धर्मांमधील भेदाभेद वाढत आहे. स्त्रीभू्रूण हत्या हा मानव जातीवरील कलंक आहे. विज्ञाननिष्ठ युग बनत असले तरी मानवाची मानसिकता आजही संकुचित आहे. ‘जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या’ हा धर्म सर्वांनी जपला पाहिजे. तेव्हाच समाजाचे पर्यायाने राष्ट्राचे कल्याण होते.साकोलीला आले यात्रेचे स्वरुपनरेंद्राचार्य महाराज येणार असल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी साकोलीत कालपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. रस्त्यावर विविध दुकाने थाटण्यात आलेली होती. प्रवचन व दीक्षा सोहळ्यामुळे साकोलीला यात्रेचे स्वरुप आले होते. आजच्या या दर्शन सोहळ्यासाठी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातून भाविक आले होते.पोलिसांचा चोख बंदोबस्तनरेंद्रचार्य महाराज यांच्या दर्शन सोहळ्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. १०० अतिरिक्त पोलीस कर्मचारी जिल्हाभरातून पोलीस प्रशासनाने तैनात केले होते.