शिवसेनेची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील लाखनी शहरातून जाणारा बाजार मार्ग हा सोमलवाडा व इतर गावांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. लाखनीचा मंगळवारचा आठवडी बाजार हा या मार्गावर भरत असल्याने अनेक लोकांना कमालीचा त्रास होत आहे. त्यामुळे लाखनी ते सोमलवाडा असा बायपास रस्त्याची निर्मिती करण्याची मागणी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.लाखनी येथील सिंधी ओळ म्हणून प्रसिध्द असलेला बाजार मार्ग हा सोमलवाडा, मेंढा, रेंगेपार (कोंढा), दैतमांगली, खेडेपार, गोंडसावरी, सोनेखारी, चिखलाबोडी या गावांना जोडणारा आहे. लाखनीचा आठवडी बाजार मंगळवारला भरत असून त्या दिवशी या मार्गाने गावाला जाणे अडचणीचे ठरत असते. लाखनी हे तहसिलचे ठिकाण असल्याने तहसिल कार्यालय, पंचायत समिती, महाविद्यालये, शाळा, रुग्णालय दैनंदिन कामे व मजुरीसाठी लोक येत असतात. लोकांची वर्दळ असते त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागतो. गावातील रुग्णांची प्रकती बिघडल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागतो.सोमलवाडा व परिसरातील लोकांच्या सेवेसाठी सिंधी ओळ व बाजार मार्गावरील आठवडी बाजार बंद करावा किंवा सोमलवाड्याला जाण्यासाठी बायपास रस्त्याची निर्मिती करण्याची मागणी केली आहे. निवेदन देतांनी शिवसेनेचे पदाधिकारी श्रीकांत नागदेवे, देवानंद उके, दिनेश वासनिक, कमलेश मेश्राम, मुकेश धुर्वे, लवकुश निर्वाण, पवन निर्वाण, सिध्दार्थ उके, अखिल पचारे, गणेश काजळखाने, जयंत परतेकी, मोना महाजन, अमय गिऱ्हेपुंजे आदी उपस्थित होते.
सोमलवाड्यात बायपास रस्ता तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2017 00:25 IST