शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

आरोग्य जोपासणे हीच आपल्या जीवनाची खरी संपत्ती

By admin | Updated: March 26, 2017 00:24 IST

आरोग्यम् धनसंपदा या वचनाप्रमाणे आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आरोग्य उत्तम असेल ....

रवीशेखर धकाते यांचे प्रतिपादन : क्षयरोग दिनाचा कार्यक्रमभंडारा : आरोग्यम् धनसंपदा या वचनाप्रमाणे आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आरोग्य उत्तम असेल तर आपण अर्थार्जन करण्यास अधिक सक्षम राहू. प्रत्येक नागरिकाने सकस आहार, नियमित व्यायाम, आवश्यक विश्रांती, रोगाचे उपचार आदींचा नियमित उपयोग करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक रवीशेखर धकाते यांनी व्यक्त केले. क्षयरोग जनजागृती चित्ररथ काढून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य वाघाये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, हिवराज उके, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. सीमा कावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, हिवराज उके, केमीस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय खत्री , दिपक फुलबांधे, विलास केजरकर, आठवले समाज कार्य महाविद्यालय च्या प्रा. ज्योती नाकतोडे, सारथी कल्याणकारी संस्थेच्या समन्वयक राजकन्या रामटेके, अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे आदी उपस्थित होते.यांनी रिबीन कापून व हिरवी झेंडी दाखवून पथसंचलनास सुरुवात केली. यावेळी धकाते यांनी, शालेय विद्यार्थ्यांना संबोधित करताना आजचे विद्यार्थी भावी काळात देशाचे आधारस्तंत व ब्रँड एंबेसेडर आहेत. कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे आरोग्य शिक्षण, क्षयरोगाबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी कुटुंबातील इतर सदस्य व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. सर्वजण मिळून टीबी संपवूया या घोषवाक्याप्रमाणे दैनंदिन जीवनात अंमलबजावणी करावी. त्यामुळे भंडारा जिल्हा क्षयरोगमुक्त करणे हे साध्य करता येईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.२४ मार्च २०१७ रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून क्षयरोग जनजागृती कार्यक्रमाचा मुख्य समारंभ सामान्य रुग्णालय भंडारा येथे संपन्न झाला. पथसंचालन मुस्लिम लायब्ररी वाचनालय चौकात थांबून आठवले समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून जनसमुदायाला क्षयरोगाबाबतची माहिती दिली. पथसंचालनामध्ये शासकीय नर्सिंग कॉलेज, एरोमिरा नर्सिंग कॉलेज, पूजा नर्सिंग कॉलेज, के.एल. पटेल नर्सिंग कॉलेज, सारथी कल्याणकारी संस्था व जिल्हा क्षयरोग केंद्रातील कर्मचारीवृंद सहभागी झालेले होते.सामान्य रुग्णालय भंडारा येथे रॅलीचे समारोप करून मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी क्षयरोगाबाबत संक्षिप्त माहिती प्रास्ताविकेमध्ये उपस्थित प्रेक्षकांना सांगितली. जसे दोन आठवड्याचा खोकला, वजनात घट होणे, भूक मंदावणे आदी लक्षणे आढळल्यास दोन थुंकी नमुने जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत येथे तपासणी करून घ्यावी. जिल्हा क्षयरोग केंद्रात सीबीनॅट मशिन उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये अवघ्या दोन तासात क्षयरोगाचे निदान करता येते. चाचण्या व टीबीची औषधे सर्व शासकीय आरोग्य संस्थेत मोफत उपलब्ध आहेत. याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले. डॉ. सीमा कावरे यांनी, क्षयरोगापासून मुक्तीच्या मार्गाकडे जाण्याकरिता शासकीय यंत्रणेला सर्व जनतेनी सहकार्य करणे आजच्या काळाची गरज निर्माण झालेली आहे. जेणेकरून सन २०२५ पर्यंत भंडारा जिल्हा क्षयरोगमुक्त ही संकल्पना नक्कीच साध्य करता येईल. याकरिता खासगी वैद्यकीय चिकित्सकांचा वेळोवेळी सहकार्य लाभेल असे प्रतिपादन केले.याप्रसंगी सारथी जनकल्याण संस्थेद्वारे टीबी कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वानखेडे यांना मानचिन्ह व गौरवपत्र तसेच शेंडे, बुराडे, करंडे, अलका रंगारी, रोशनी चौरसिया, बाबूराव रामटेके, माने, बुरडे, कुरैशी यांना गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले. शालेय विद्यार्यांनी रॅलीमध्ये घोषवाक्याद्वारे सर्वसामान्यांपर्यंत क्षयरोगाचा संदेश पोहचविण्यात आला. संचालन शिवशंकर शेंडे यांनी केले. तर आभार सुशील बन्सोड यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)