शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

जातीय सलोखा कायम राखा

By admin | Updated: September 19, 2015 00:45 IST

गणेशाचे आगमन पावसाने झाले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

जातीय सलोखा समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादनभंडारा : गणेशाचे आगमन पावसाने झाले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. अशा या वातावरणात जनतेने सर्व धर्माप्रती मानवतावादी दृष्टिकोन ठेवून उत्सव आनंद व उल्हासात साजरा करण्यासाठी शांतता व जातीय सलोखा कायम राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस मिटींग सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, पोलीस उपअधीक्षक पी.पी. धरमशी, पुरवठा अधिकारी मिलींद बनसोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आडे, तहसिलदार सुशांत बनसोडे, भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी रविद्र देवतळे उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, जनता व प्रशासन यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेने सर्व धर्माप्रती मानवता दृष्टीकोन ठेवला पाहिजे. माझा धर्म मोठा अशी भावना बाळगायला नको, सहिष्णूता राखली पाहिजे. आपल्या देशात युवकांचे प्रमाण ५० टक्के असतांना अशा घटना होत असतील तर त्यासाठी सदविवेक बुध्दीची आवश्यकता आहे. या देशात गरीबी, कुपोषण असे अनेक प्रश्न असतांना जाती धर्माच्या नावावर वाद घालणे योग्य नाही. या सामाजिक समस्येवर मात करण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकत आहे. गणेशोत्सव मंडळानी सामाजिक समस्या, मुलींच्या शिक्षणावर आधारित दृष्ये गणेशोत्सवाचे ठिकाणी सादर करावीत. यामुळे जनजागृती होऊन देशाच्या विकासात भर पडेल. गणेशाची विटंबना होणार नाही. याची दक्षता गणेश मंडळानी घ्यावी. मंडळाचे काम सचोटीपूर्ण असावे. दारु पिऊन नागरिकांना तसेच महिलांना त्रास होईल असे कृत्य करु नये व इतरांना त्याठिकाणी दारु पिऊन येण्यास मज्जाव करावा. अभद्र व्यवहार करु नये. गणेशोत्सवात अवैध विद्युत पुरवठा घेऊ नये. या कारणांमुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशाची घटना महत्वाची असून कायद्यापुढे सर्व धर्म समान आहेत याचेही नागरिकांनी भान ठेवावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात सकारात्मक विचारधारा दिसून येत आहे. त्यानुसार कोणाचेही अहित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विसर्जनाच्या दिवशी वेळेचे, सुरक्षिततेचे तसेच पोलीस विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गणेशोत्सवानंतर शहरातील अतिक्रमणाची कार्यवाही त्वरीत करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.गणेशोत्सव व बकरी ईद या सणांदरम्यान काही असामाजिक तत्व प्रशासनाच्या चुका शोधून त्याचे भांडवल करतात. चुकीच्या सामाजिक व धार्मिक बाबींविरुध्द जनतेने उभे राहून चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा. या गणेशोत्सवा दरम्यान ५० सार्वजनिक गणेश मंडळ असून जिल्हयात एक गाव एक गणपती या नुसार २५७ गणेश मंडळाची नोंद घेण्यात आली आहे. तसेच जिल्हयात अंदाजे २२०८ खाजगी गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले. संयम व शांततेने सर्व सण साजरे करावे व जिल्हयातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांनी केले. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी प्रास्ताविकातून जनता व प्रशासन यांच्यात जातीय सलोखा राखण्याविषयी समितीची भूमिका विषद केली. संचालन पोलीस निरीक्षक कोलवटकर यांनी केले तर परिविक्षाधीन पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीला जिल्ह्यातील शांतता समितीचे सदस्य, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा, पवनी, साकोली तसेच पोलीस अधिकारी, इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)