शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रावणवाडी जलाशयाचे मुख्य गेट तुटलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:54 IST

सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे शासनाचे धोरण असून मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे शासनाचे धोरण असून मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. परंतु रावणवाडी जलाशयाचे मुख्य गेट तुटलेले असून या जलाशयातून पाण्याचा दररोज अपव्यय सुरू आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष अद्याप गेलेले नाही.भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी हे मुख्य पर्यटनस्थळ असून दाट वनराईने नटलेले आहे. दोन डोंगराच्या मधोमध विस्तीर्ण जलाशय असून दररोज हजारो पर्यटक रावणवाडीला भेट देत असतात. विस्तीर्ण पसरलेल्या जलाशयाला एक मुख्य गेट असून या गेटमधून रावणवाडी, वाकेश्वर, बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याद्वारे पाणी दिले जाते. व याच पाण्यावर रावणवाडी परिसर सुजलाम-सुफलाम झालेला आहे. परंतु मागील वर्षापासून जलाशयाचे मुख्य गेट तुटलेले असून या जलाशयातून पाण्याचा अपव्यय होत आहे. याबाबत रावणवाडी, वाकेश्वर, बोरगाव येथील शेतकऱ्यांनी भंडारा पाटबंधारे विभागाला निवेदन दिले परंतु या विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही. सद्यस्थितीत जलसाठा कमी असल्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. या मुख्य गेटची दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.