शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

महर्षीचा पराग जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:08 IST

मंगळवारी दुपारी घोषित करण्यात आलेल्या दहावीच्या सीबीएसई निकालात भंडारा येथील महर्षी विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी पराग शेषराव आंबिलढुके हा ९७.२० टक्के गुण जिल्ह्यातून प्रथम आला. भंडारा येथील सनिज स्प्रिंग डेल शाळेची मिताली नाकाडे व महर्षी विद्या मंदिरची आरोही चव्हाण या दोन्ही विद्यार्थिंनीनी ९७ टक्के गुण घेऊन संयुक्तपणे द्वितीय येण्याचा मान पटकाविला. जिल्ह्यात महर्षी विद्या मंदिर भंडारा, सनिज स्प्रिग डेल शाळा, सेंट मेरीस शाळा भंडारा, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कारधा या सीबीएसई शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

ठळक मुद्देसीबीएसई दहावीचा निकाल : ४४८ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मंगळवारी दुपारी घोषित करण्यात आलेल्या दहावीच्या सीबीएसई निकालात भंडारा येथील महर्षी विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी पराग शेषराव आंबिलढुके हा ९७.२० टक्के गुण जिल्ह्यातून प्रथम आला. भंडारा येथील सनिज स्प्रिंग डेल शाळेची मिताली नाकाडे व महर्षी विद्या मंदिरची आरोही चव्हाण या दोन्ही विद्यार्थिंनीनी ९७ टक्के गुण घेऊन संयुक्तपणे द्वितीय येण्याचा मान पटकाविला. जिल्ह्यात महर्षी विद्या मंदिर भंडारा, सनिज स्प्रिग डेल शाळा, सेंट मेरीस शाळा भंडारा, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कारधा या सीबीएसई शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.भंडारा जिल्ह्यातून सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेला एकूण ४४८ विद्यार्थी बसले होते. यात महर्षी विद्या मंदिर या शाळेतून २२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. पराग आंबीलढुके प्रथम तर आरोही रामनाथ चव्हाण हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. आरोहीला ९७ टक्के गुण आहेत. याच शाळेतील पारस झोडे (९५.२०), गुंजन पदमगिरीवार (९४), अक्षद हटवार (९४), उत्कर्ष साठवणे (९४), सानिका नंदनवार (९३.२०), प्रांजल कापगते (९३.२०), आस्था राठी (९३), जितेश गव्हाळे (९२.८०), गौरव साकुरे (९२.८०), जतीन कापगते (९२.६०), अनिकेत धाडसे (९२.४०), निकीता येरणे (९२.२०), गोराक्ष डोमळे (९१.६०), हर्ष लांबट (९१.६०), गौरव हटवार (९१.६०), मृणाली सदावर्ती (९१.४०), प्रणय गायधने, श्रुती चेटुले या दोघींना ९१.२० तर प्रणव चांदेवारला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. प्राचार्य श्रुती ओहळे यांनी गुरूपुजेनंतर शाळेचा निकाल जाहीर केला.स्प्रिंग डेल शाळेचा निकाल अव्वलयेथील सनीज स्प्रिंग डेल शाळेचा दहावी सीबीएसईचा निकाल जाहीर झाला असून एकुण विद्यार्थ्यांपैकी शाळेतून प्रथम क्रमांकावर मिताली नाकाडे हिला ९७ टक्के, द्वितीय क्रमांकावर आर्यन राणे ९६.६ तसेच तृतीय क्रमांकावर रॉगल भुरे ९६.४ हे अव्वल ठरले. याशिवाय २२ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकाविला. संस्कृत विषयात आठ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले. ४४ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली तर इंग्रजी विषयात ४३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे सचिव सुनिल मेंढे, प्राचार्या अनघा पदवाड यांनी कौतुक केले.सेंट मेरीस शाळा, भंडारायेथील सेंट मेरीस शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेतून यावर्षी पहिल्यांदाच ११ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. मृणाली गिरीश पटले व राज मधुकर डोरले या दोन्ही विद्यार्थ्यांनी ८६ टक्के गुण प्राप्त करून शाळेतून संयुक्तपणे प्रथम येण्याचा मान पटकाविला. मृणालीला इंग्रजीमध्ये ९० तर संस्कृतमध्ये ९१ गुण प्राप्त झाले आहेत. आदित्य वडीचार ८२ टक्के तर अमिषा भैरव नागपुरे या विद्यार्थिनेही यश पटकावले आहे.केंद्रीय विद्यालय जवाहरनगरजवाहरनगर स्थित केंद्रीय विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. यात ५० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर तीन विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. यात शाळेतून क्रिष्णकांत सिंग या विद्यार्थ्याने ९२.२० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. आचल हटवार ९०.६० टक्के गुण घेऊन द्वितीय तर यश अतुल दुधे या विद्यार्थ्याने ९०.४० टक्के गुण घेऊन शाळेतून तृतीय येण्याचा मान पटकाविला.पोदार इंटरनॅशनल शाळाकारधा स्थित पोदार इंटरनॅशनल शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात १८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पोदार शाळेतून विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची प्रथमच परीक्षा दिली आहे.पराग आंबिलढुकेला व्हायचंय शास्त्रज्ञभंडारा जिल्ह्यातून सीबीएसई दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेला महर्षी विद्या मंदिरचा पराग आंबिलढुके या विद्यार्थ्यांला भविष्यात शास्त्रज्ञ व्हायचे आहे. सद्यस्थितीत त्याने आपले लक्ष आयआयटीकडे केंद्रीत केले आहे. विज्ञान हे त्याचे आवडते क्षेत्र असून अभियांत्रिकी क्षेत्रात कौशल्य दाखवून विशेष बाब म्हणून शास्त्रज्ञ होण्याची इच्छा त्याने ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. परागच्या कुटुंबात आईबाबा व मोठी बहिण आहे. आईवडील दोघेही शिक्षक असून मोठी बहिण हर्षिता हीसुद्धा दोन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेत (सीबीएसई) जिल्ह्यातून प्रथम आली होती. अभ्यासात सातत्यपणा व वेळोवेळी शिक्षकांसह आईवडिलांचे मार्गदर्शन हेच माझ्या यशाचे गमक असल्याचेही परागने यावेळी सांगितले.