साकोली येथे रविवारी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, महिला महासचिव सविता ब्राह्मणकर, अंजिरा चुटे, महिला तालुकाध्यक्ष छाया पटले, शंकर राऊत, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मासुरकर, आनंद परशुरामकर, सुनीता कापगते, रेखा वासनिक, बाळू हटनागर, अश्विनजी नशिने, मंदा गणवीर, मार्तंड भेंडारकर, जितेंद्र नशिने, सीमा भुरे, विष्णू रणदिवे आदी उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले, सध्या केंद्र सरकारने महागाई वाढवून गोरगरिबांची जणू लूट केली आहे. माझी लढाई सत्त्तेपेक्षा देशाला वाचवण्यासाठी आहे. काँग्रेस वाचेल तर देश वाचेल. यासह केंद्र सरकारवर बोचरी टीका केली.
कार्यकर्ता मेळाव्यात जिल्ह्यातून अनेक भागातून बहुसंख्य लोक उपस्थित झाले होते. त्यात काँग्रेस पक्षात अनेक तालुक्यातून आलेल्या लोकांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष होमराज पाटील कापगते, संचालन डॉ. अशोक कापगते, तर आभार प्रदर्शन दिगेस समरीत यांनी केले.