लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सलग दोन दिवस पासून संततधार पावसाने हजेरी लावली असल्याने बावनथडी नदीला पूर आला आहे. बावनथडी नदीवरील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांना जोडणाऱ्या पुलावर पाणी असल्याने दोन राज्याचा संपर्क तुटला आहे. नद्यांचे शेजारी असणाऱ्या गावात पुराचे पाणी शिरले आहे.वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. नद्या, नाले आणि तलावांची पाण्याची पातळी ओलांडली आहे.एरवी कोरडी वाहणाऱ्या बावनथडी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. याच नदीवर बपेरा आंतरराज्यीय सिमेनजीक मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडण्यासाठी रॉप्टर पद्धतीने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलावर पाणी वाढल्याने वाहतूक बंद झाली आहे. दोन राज्यांचा संपर्क तुटल्याने अनेक प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.दोन राज्याचे सीमावर्ती गावात प्रवाशी अडले आहेत. या शिवाय वारपिंडकेपार गावात तलावाचे पाणी गावात शिरल्याने पाणीच पाणी आहे. चुल्हाड गावात अनेक घरात पाणी शिरले असून रस्ते जलमग्न झाली आहेत. नद्यांचे वरील असणारे सिमेंट प्लग बंधारे ओव्हरफ्लो झाला आहे. चांदपूर जलाशयाचे पाण्याचे पातळीत वाढ झाली आहे. नद्यांचे काठावरील गावकºयांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्याचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:12 IST
सलग दोन दिवस पासून संततधार पावसाने हजेरी लावली असल्याने बावनथडी नदीला पूर आला आहे. बावनथडी नदीवरील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांना जोडणाऱ्या पुलावर पाणी असल्याने दोन राज्याचा संपर्क तुटला आहे. नद्यांचे शेजारी असणाऱ्या गावात पुराचे पाणी शिरले आहे.
महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्याचा संपर्क तुटला
ठळक मुद्देगावात शिरले पाणी : बावनथडी नदीच्या पुलावर पाणी