शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र वीज भारनियमन मुक्तच आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सध्या राज्यात शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. ...

ठळक मुद्देविश्वास पाठक : शेतकऱ्यांना आठ तास वीज पुरेशी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या राज्यात शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. शेतकºयांना आठ तास वीज पुरेशी असून त्यापेक्षा अधिक वीज दिली तर भुगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य भारनियमन मुक्तच आहे, असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.गत चार वर्षात ऊर्जा विभागाने केलेल्या विकास कामाचा आढावा घेत त्यांनी शासनाचा विविध योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, भारनियमन होत असल्याची ओरड सर्वत्र आहे. परंतु शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज देण्याचा नियम आहे. त्यापेक्षा कमी वीज दिली तर भारनियमन म्हणता येईल. सध्या शेतकºयांना रात्री वीज दिली जाते. त्यामुळे त्यांच्यापुढे विविध समस्या आहेत. दिवशी वीज पुरवठा कशा केला जाईल, यावर उपाययोजना सुरु असून अटल सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून दिवसा वीज देण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीने सेंट्रलाईज बिलींग सिस्टम आणली असून २ कोटी २५ लाख ग्राहक तंत्रज्ञानाचा वापर करतात. तर १ कोटी ४० लाख ग्राहक मोबाईलशी जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला जाणार असून ग्राहकांना ई-मेलवरच बिल पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे वीज वितरणचे प्रत्येक बिलामागे दहा रुपये वाचतिल. त्याचा अप्रत्यक्ष फायदा ग्राहकांनाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रत्येक गावात व घरात वीज पोहचविली जात असून गडचिरोली व नंदूरबार जिल्हा वगळताच सर्वच गावात वीज पोहचल्याचा दावा त्यांनी केला. वीजेचे अपघात टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात असून ५० वर्षावरील कर्मचाºयांच्या मदतीला हेल्पर देण्यात आले आहे. तसेच लवकरच २३ हजार ग्रामविद्युत सेवक नियुक्त केले जातील असेही पाठक यांनी सांगितले.जिल्ह्यात वीज दुरुस्ती कामांसाठी ४६ कोटीवीज वितरण कंपनीचे गावागावत असलेले खांब वाकले आहेत. तार लोंबकळत आहेत. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. या कामांच्या दुरुस्तीसाठी भंडारा जिल्ह्यात ४६ कोटी रुपये मंजूर आहे. अलीकडेच ११ कोटी ५० लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून वर्षभरात ही कामे पुर्ण होतील असे विश्वास पाठक यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीज