शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; कुठे कार्यकर्त्यांची लगबग; कुठे सभांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

भंडारा शहरातील सर्वच पक्ष कार्यालयात दुपारी पाहणी केली. यावेळी येथे ५०-६० कार्यकर्ते दिसून आले. यातील काही कार्यकर्ते खुर्चीवर बसून होते तर बाहेर गावाहून आलेले कार्यकर्ते प्रचार प्रमुख आपल्याला केव्हा वाहन देतात आणि आपण कधी एकदाचे प्रचार मोहिमेवर निघतो याची वाट पहात कार्यकर्ते बसले होते. आपल्या गाडीत कोण कोण असणार, याचेही नियोजन कार्यकर्त्यांमध्ये चालले होते.

ठळक मुद्देपक्ष कार्यालयात खलबते : कुणी राबतोय तर कुणाची होतेय चांदी, गावागावांत प्रचाराची रणधुमाळी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण मतदारसंघातील प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी विविध पक्ष कार्यालयात सध्या लगबग सुरू आहे. विरोधकांचे नेमके काय चालले आहे आणि त्यांना शह देण्यासाठी काय करता येईल, याची खलबते पक्ष कार्यालयातील बंद खोलीत होऊ लागली आहेत. दिवसभराच्या नियोजनासोबतच कार्यकर्त्यांशी संपर्क आणि रॅली आणि कॉर्नर बैठकांच्या नियोजनात कारभारी व्यस्त आहेत.सर्व पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचार मोहिमेवर निघण्याची लगबग सकाळी १० वाजता सुरू होती तर काही कार्यकर्ते कॉर्नर बैठका, मेळावे, सभा याच्या आयोजनात दंग असल्याचे चित्र पहावयास मिळाले. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा राबता या कार्यालयात असल्याचे पहायला मिळाले.भंडारा शहरातील सर्वच पक्ष कार्यालयात दुपारी पाहणी केली. यावेळी येथे ५०-६० कार्यकर्ते दिसून आले. यातील काही कार्यकर्ते खुर्चीवर बसून होते तर बाहेर गावाहून आलेले कार्यकर्ते प्रचार प्रमुख आपल्याला केव्हा वाहन देतात आणि आपण कधी एकदाचे प्रचार मोहिमेवर निघतो याची वाट पहात कार्यकर्ते बसले होते. आपल्या गाडीत कोण कोण असणार, याचेही नियोजन कार्यकर्त्यांमध्ये चालले होते.शहरातील कॉर्नर बैठकांना हजर रहा म्हणून प्रचार प्रमुख कार्यकर्त्यांना सांगत होते. कोणत्या गावात कॉर्नर बैठका घ्यायच्या याबाबतही नियोजन सुरू होते. पुढील तीन दिवस मतदारसंघात घेण्यात येणाऱ्या सभांचे नियोजन पहिल्या फळीतील कार्यकर्ते करीत होते. कुठल्या गावांना वाहने पाठवून कार्यकर्ते गोळा करायचे. गावागावातील कार्यकर्त्यांना दूरध्वनीवरून संपर्क करून सभांना, मेळाव्यांना, प्रचारफेऱ्यांना हजर राहण्याबाबतही विनंती केली जात होती. तर काही कार्यकर्त्यांवर पॉम्प्लेट वाटण्याची जबाबदारी दिली जात असल्याचे चित्र पहायला मिळाले. प्रचारफेऱ्यांचे नियोजन करताना काही कार्यकर्ते या कार्यालयावर आढळून आले. याकरिता सकाळच्यावेळी सर्वच पक्षाच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी झालेली दिसून येते.प्रचाराच्या दिवसांचे महत्व जाणत तर कामाव्यतिरिक्त अधिक वेळ कार्यकर्त्यांना संपर्क कार्यालयात बसू ही दिले जात नाही. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात मतदार संघात प्रचारफेऱ्या, बैठका, रॅलीचे आयोजन केले जात आहे. कार्यकर्त्यांचे सर्व सोय करीत कार्यालयाच्या परिसरातच जेवणाच्या पंगती उठत आहेत.कार्यकर्त्यांची चलतीनिवडणुकांव्यतिरिक्त इतरवेळी दुरावलेल्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान महत्व आले असल्याचे दिसत आहे. कार्यालयाच्या परिसरातच जेवणावळी उठत आहेत. नाराज कार्यकर्त्यांच्या परिसरातच जेवणावळी उठत आहेत. नाराज कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी उमेदवारांकडूनच प्रयत्न केले जात आहेत. कार्यकर्ता दुरावून मतदारावर त्याचा परिणाम होऊ नये याकरिता तुमच्यासाठी काय पण, असे म्हणत कार्यकर्त्यांची कोणतीही मागणी मान्य केली जात आहे. सोशल मिडियाचा वापर करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या मोबाईलसाठी प्रचार करणारी रिंगटोनही डाऊनलोड करून दिली जात आहे.मनधरणीवर जोरनिवडणुकीच्या तोंडावर पक्षांसह बंडखोर उमेदवारांना कार्यकर्त्यांची तर कार्यकर्त्यांना मतदाराची मनधरणी करण्यासाठी आपले कसब दाखवावे लागत आहे. सकाळी एक, दुपारी दुसराच तर सायंकाळी तिसराच उमेदवार दारी येत असल्याने मतदारांनाही कोणता झेंडा हाती घेऊ, अशी कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे त्या-त्या पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांना त्या-त्या परिसरातील आणि परिचीत मतदारांना सांभाळण्याचे सक्तीचे आदेश दिले जात आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा