शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : विकासाचा प्रश्न अन् गावपुढाऱ्यांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:01 IST

प्रचाराला केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. प्रत्येक उमेदवार स्वत: किती चांगले आणि इतर पक्ष किती वाईट, हेच सांगत सुटले आहेत. मात्र, आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरी झडत असताना गावागावांतील मूलभूत समस्या मात्र अद्यापही जैसे थेच आहेत.

ठळक मुद्देरणधुमाळीला आला वेग : मतदार सुनावताहेत उमेदवारांना खडे बोल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावपुढाऱ्यांनी गावातील मूलभूत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या समस्या जैसे थेच आहेत. विविध प्रमुख पक्षांच्या स्वबळावर लढण्याच्या निणर्यामुळे गावपुढाºयांची गोची झाली आहे.प्रचाराला केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. प्रत्येक उमेदवार स्वत: किती चांगले आणि इतर पक्ष किती वाईट, हेच सांगत सुटले आहेत. मात्र, आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरी झडत असताना गावागावांतील मूलभूत समस्या मात्र अद्यापही जैसे थेच आहेत. अलीकडे मतदारही दूधखुळे राहिलेले नाहीत. ते दारात मत मागण्यासाठी आलेल्या उमेदवाराला ‘आधी विकासाचे बोला, मतांचे नंतर बघू’ असे खडे बोल सुनावत आहेत. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात ३९ उमेदवार रिंगणात आहेत. बंडखारीमुळे राजकीय वातावरण बदलले. स्वपक्षात उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी अन्य पक्षांचा झेंडा हाती घेतला. काही नवख्या उमेदवारांसाठी पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समस्यादेखील नव्याच आहेत. या अवघड परिस्थितीत मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे.प्रत्येक मतदारसंघात एमआयडीसी आहे. मात्र, उद्योग नाहीत, रस्ते नाहीत. दर्जेदार शिक्षण, शेतमालावर आधारित उद्योग, पाणीटंचाई, भारनियमन यांसह अनेक मूलभूत समस्या जैसे थे आहेत. यंदा चुरसदार निवडणूक लढविली जात असल्याने उमेदवारांची भाऊगर्दी आहे. हे उमेदवार मतदारांना आश्वासन देत आहेत. मात्र, मूलभूत समस्यांनी ग्रासलेले मतदार उमेदवारांना खडे बोल सुनावत आहेत.आश्वासनांची पूर्तता होणार का?अलीकडच्या काळात मतदार मोठ्या प्रमाणात जागृत झाला आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी रेकॉर्डब्रेक होण्याची शक्यता आहे. मतदानाचे महत्त्व मतदार जाणू लागला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून आश्वासन नको आहे. उमदेवारांच्या आश्वासनावर त्याचे समाधान होत नसून आश्वासनांच्या पुर्ततेची मागणी तो करू लागला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा