शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
5
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
6
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
7
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
8
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
9
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
10
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
11
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
12
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
14
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
15
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
16
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
17
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
18
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
19
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
20
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीने आले सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

सध्या दिवसा उष्णतामानात वाढ झाली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमा भौगोलिक दृष्ट्या लागून असल्या तरी सुमारे ४० ते ५० किमी परिसरात हा मतदार संघ पसरलेला आहे. लहान-मोठी गावे तथा तुमसर व मोहाडी शहराचा त्यात समावेश आहे. चारचाकी व दुचाकी वाहनांनी प्रचार केला जात आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियाच्या पोस्टवर करडी नजर : मजुरांना मिळाले काम, सीमावर्ती भागात गस्त

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर मतदार संघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. चार दिवस शिल्लक आहेत. तुमसर व मोहाडी तालुक्यात खाणावळीला सध्या सुगीचे दिसत आले आहेत. कार्यकर्त्यांचे जत्थे ढाब्यावर, हॉटेलमध्ये गर्दी करताना दिसत आहे. निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे तशी कार्यकर्त्यात धाकधुक वाढली आहे. सध्या दिवसा उष्णतामानात वाढ झाली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही.तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमा भौगोलिक दृष्ट्या लागून असल्या तरी सुमारे ४० ते ५० किमी परिसरात हा मतदार संघ पसरलेला आहे. लहान-मोठी गावे तथा तुमसर व मोहाडी शहराचा त्यात समावेश आहे. चारचाकी व दुचाकी वाहनांनी प्रचार केला जात आहे. सायंकाळी ही सर्व कार्यकर्ते मंडळी शहरातील ढाब्यावर व हॉटेलमध्ये गोळा होतात. त्यामुळे सध्या खाणावळी व हॉटेल्स हाऊसफुल्ल दिसत आहेत.मजुरांना मिळाले कामगावखेड्यात सध्या शेतीची कामे सुरु आहेत. धान कापणीला सुरूवात झाली आहे, परंतु गाव खेड्यातील नागरिक सध्या प्रचारात मग्न दिसत आहे. त्यांच्याही हाताला काम मिळाले आहे. २१ ऑक्टोबरनंतरच शेतीच्या कामात मजूर परतणार आहेत. गाव, शहरात सध्या निवडणुकीची हवा तयार झाली आहे.नियमांत बसवून प्रचार शिगेलाविधानसभा निवडणुकांत प्रचार सभा जितक्या महत्त्वाच्या असतात, तितक्याच गटाच्या बैठकीतील चर्चाही महत्त्वाच्या अन् त्या प्रभावी घडण्यासाठी सध्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पूरक ठरू लागल्या. मोठया संस्थांबरोबरच गावातील लहान संस्थांच्या वार्षिक सभा अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे आपल्या नेत्याच्या निवडणुकीची तयारी करण्यासंदर्भात एकत्रित चर्चा करण्याची संधी साधली जात आहे. आयोगाच्या परवानगीने गावोगावी सभा घेण्याचा धडाका सुरू झाला आहे.सोशल मिडिया सेलसोशल मिडियार सध्या एकेरी वाक्याचा उपयोग करून पोस्ट घालण्यात येत आहे. त्यात व्हॉट्स अ‍ॅप व फेसबुक, ट्वीटचा समावेश आहे. व्यक्तीगत, खाजगी आयुष्याबाबत बदनामीकारक व भ्रष्टाचाराबाबत पोस्ट घालण्याचा सपाटा सुरू झाला आहे. कोणताही आर्थिक लेनदेन झाल्याचा पुरावा उपलब्ध नसताना बदनामीकारक पोस्ट घातल्या गेल्या त्यांची शहानिशा संबंधित विभागाकडून सुरू झाली आहे. उच्चस्तरीय सोशल मीडिया सेल ही कामे बघत आहे. यामध्ये कारवाई होणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा