शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महालगाव शाळेची इमारत जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:45 IST

मोहाडी तालुक्यातील महालगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली असून भिंतीलर तडे गेले असून कवेलूही फुटलेले आहे. ही इमारत केव्हाही कोसळू शकते. विद्यार्थ्याना ग्रामपंचायतीच्या इमारतीत शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. या इमारतीची डागडुजी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देभिंतींना तडे : शाळा भरते ग्रामपंचायतच्या इमारतीत, दुरुस्तीची गावकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी तालुक्यातील महालगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली असून भिंतीलर तडे गेले असून कवेलूही फुटलेले आहे. ही इमारत केव्हाही कोसळू शकते. विद्यार्थ्याना ग्रामपंचायतीच्या इमारतीत शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. या इमारतीची डागडुजी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.महालगाव जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम १९४२ मध्ये झाले होते. आता या इमारातीला ७७ वर्षे होत आहे. येथे पहिली ते चवथीपर्यंत शाळा असून ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सध्या दोन शिक्षक कार्यरत आहेत. या धोकादायक इमारतीत अपघात घडण्याची भीती असल्याने आता महालगावची शाळा ग्रामपंचायती कार्यालयात भरविली जाते. स्वतंत्र्यापूर्वी बांधलेल्या या शाळा इमारतीच्या देखभाल दुरुस्तीवर अनेकदा खर्च करण्यात आला. मात्र या इमारतीची कालमर्यादाच संपली आहे. दुरूस्ती करूनही उपयोग होण्याची शक्यता नाही. दरम्यान इमारतीच्या दुरूस्तीसाठी महालगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ईश्वर ढबाले या इमारतीच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीत त्यांना आश्वासन दिले. परंतु, अद्यापही इमारतीच्या डागडुजीला प्रारंभ झाला नाही. मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. शाळेची नवीन इमारत तयार होत नाही तोपर्यंत पाठपुरवा करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता, मोहाडीचे गटशिक्षणाधिकारी, कनिष्ठ अभियंत्यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी शाळेची इमारत मोडकळीस आलेली, लाकुड सडलेले, कवेलू फुटलेले आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना सदर इमारतीमध्ये बसविणे फारच धोक्याचे असल्याचे त्यांनी कबुल केले. तसेच ही इमारत दुरूस्ती करता येणार नाही. नवीन इमारत बांधकाम मंजूर करण्याकरिता शिक्षण सभापतींकडून प्रयत्न करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंत्यांनी आश्वासन दिले.शाळा पाहणी दरम्यान सरपंच तुलाराम हारगुळे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावकरी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शाळेची नवीन इमारत मंजूर करावी अशी मागणी महालगाव ग्रामपंचायतचे सदस्य ईश्वर ढबाले यांनी केली आहे.जिल्हा परिषद प्रशासनाने या शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देऊन तात्काळ बांधकामस सुरूवात करण्याची गरज आहे. त्यातही विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी कामाला सुरूवात होणे गरजेचे आहे.तलाठ्याने दिले इमारत जीर्ण असल्याचे पत्रकोणत्याही निवडणुकीत महालगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान घेतले जायाचे. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तलाठ्याने शाळेची इमारत जीर्ण असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाºयाला दिले. त्यामुळे लोकसभेसाठी मतदार करण्यास महालगाववासीयांना एक किमी अंतरावरील मोरगाव जिल्हा परिषद शाळेत जावे लागले.