शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

‘मधुमक्षिका’ देईल शेतकऱ्यांना आर्थिक आधार

By admin | Updated: December 27, 2014 22:45 IST

जगातील सर्व मधमाशा नष्ट झाल्यास केवळ चार वर्षांत जगाचा नायनाट होईल, असे भाकित २० व्या शतकातील महान वैज्ञानिक अलबर्ट आईनस्टाईन यांनी केले होते. हे किती खरे आहे

भंडारा : जगातील सर्व मधमाशा नष्ट झाल्यास केवळ चार वर्षांत जगाचा नायनाट होईल, असे भाकित २० व्या शतकातील महान वैज्ञानिक अलबर्ट आईनस्टाईन यांनी केले होते. हे किती खरे आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे़ परंतु मधमाशी पालनाने शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो, असा निष्कर्ष पवनी येथील विज्ञान महाविद्यायाचे प्रा. डॉ. संजय घुगल व प्रा. डॉ. बी.एस. राहिले यांनी नोंदविला आहे. मधमाशा व पिके एकमेकांना पूरकभारत अन्नधान्याच्या उत्पादनात जगात पाचव्या स्थानी आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्थिती फारशी चांगली नाही. अल्पभूधारक शेतकरी आजही शेतीला योग्य पूरक व्यवसायाच्या शोधात आहे. ‘मधुमक्षिका’ पालन हा त्याच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो़ पृथ्वीवरील जीवांच्या उत्क्रांती प्रक्रियेत प्राणी जीवन निर्माण होण्यापूर्वी फुलणाऱ्या वनस्पतीवर खाद्यासाठी पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या मधमाश्यांचा जन्म झाला. शेतातील पिके, वनस्पती व मधमाशा हे एकमेकांना पूरक आहेत. शेतपिकापैकी गळिताची धान्ये, कडधान्ये, चाऱ्याची पिके, मसाल्यांची पिके, बियाण्याची पिके व फळफळावळ यासारखी पिके परागभवनासाठी मधमाशांसारख्या किटकावर अवलंबून असतात. मधमाशांना परागफलन केल्याने या पिकांची प्रत वाढत असल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. मधमाश्यांअभावी चांगले उत्पादन होऊ शकत नाही असा निष्कर्षही या संशोधकांनी काढला आहे. इतर कोणत्याही कीटकांपेक्षा पराग फलनासाठी मधमाशा कार्यक्षम आहेत. मधमाशी पालनातील अडचणीमधमाश्यांच्या एका वसाहतीत सुमारे ५ ते १० हजार मधमाशा असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात परागसिंचन करण्याची क्षमता दुसऱ्या कोणत्याही किटकांत नसते. या मधमाशा फुलातील मकरंद गोळा करून मधाची निर्मिती करतात. त्यांचे हे कार्य निरंतर सुरू असते. पाळीव मधमाश्यांच्या वसाहतीच्या माध्यमातून हमखास परागफलन करता येते. महाराष्ट्रात सुमारे २१० लाख हेक्टर क्षेत्र निरनिराळ्या पिकांच्या लागवडीखाली आहे. तृणधान्य व भुईमूग वगळता सर्वच गळितांच्या पिकांच्या फुलोऱ्यापासून मधनिर्मिती केली जाते. मात्र मधमाशी पालनात काही अडचणी आहेत. खरीप व रबी हंगाम वगळता अन्य हंगामात त्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. कीटकनाशकांचा अती वापर हा मधमाशांसाठी हानीकारक ठरला आहे.स्वयंरोजगार प्रदान करणारा व्यवसाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी शासनाने डॉ. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यांनी आपल्या अहवालात शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी अशी शिफारस केली आहे. मधमाशी पालनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असा निष्कर्ष डॉ.घुगल व डॉ. राहिले यांनीही आपल्या अभ्यासात नोंदविला आहे. मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना एकरी पिक वाढीस मदत मिळू शकते. फुलात सुकून वाया जाणारा मकरंद व पराग मधमाशांच्या माध्यमातून गोळा करून कोट्यवधी रुपये किमतीच्या मधाची व मेनाची निर्मिती केली जाऊ शकते. मधमाशी पालन हा व्यवसाय स्वयंरोजगार प्रदान करणारा ठरू शकतो. यासोबतच या व्यवसायाला लागणारे पूरक व्यवसाय देखील गावांत निर्मित केले जाऊ शकतात. एका शेतकऱ्याने ८ ते १० वसाहती पाळल्यास त्याला चांगला मोबदला मिळू शकतो. (जिल्हा प्रतिनिधी)