अनर्थ टळला : करंट लागून म्हशीचा जागीच मृत्यू तुमसर : युनिव्हर्सल फेरो कारखान्यात वीज वाहून नेणाऱ्या खांबाला तारांचा स्पर्श होऊन एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला. कारखान्याने नुकसान भरपाई द्यावी याकरिता माडगी येथील ग्रामस्थांनी कारखान्यासमोर निदर्शने केली. सुदैवाने म्हैस मालक सुदैवाने बचावला. श्रावण पंचबुध्दे रा.माडगी हे सायंकाळी शेतातून म्हैस घेऊ न घरी जात होते. युनिव्हर्सल कारखान्याच्या मुख्य फाटकासमोर वीज खांबाजवळ म्हैस खांबाच्या संपर्कात येताच तिला वीजेचा धक्का बसला. यात ती जागीच ठार झाली. ही घटना गावात पसरल्यानंतर माडगीचे ग्रामस्थ कारखान्यासमोर जमा झाले. त्यांनी कंपनीविरोधात घोषणाबाजी केली. तुमसरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे, उपनिरिक्षक सुरेश हावरे ताफ्यासह माडगीत दाखल झाले. म्हैस मालक पंचबुध्दे यांनी नुकसानभरभाईची मागणी कंपनी अधिकाऱ्यांसमोर केली. जिल्हा परिषद सदस्य खेमराज पंचबुध्दे, पंचायत समिती सदस्य अशोक बंसोड, उपसरपंच फुकट हिंगे, बोधानंद रोडगे, स्नेहल रोडगे, कंपनीचे अधिकारी दुबे यांच्यात चर्चा होऊन श्रावण पंचबुध्दे यांना ४० हजार देण्याचे ठरले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले. (तालुका प्रतिनिधी)
माडगीत निदर्शने
By admin | Updated: August 5, 2016 00:42 IST