शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तामसवाडी रेती घाटावरून यंत्राने रेती उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2016 00:48 IST

वैनगंगा नदीपात्रातील तामसवाडी (सि.) रेती घाटावरून महसूल विभागाच्या आशीर्वादाने नियमबाह्यपणे पोकलँड मशीनने सर्रास रेतीचा उपसा सुरु आहे.

पर्यावरणाला धोका : जिल्हाधिकारी कारवाई करणार काय?तुमसर : वैनगंगा नदीपात्रातील तामसवाडी (सि.) रेती घाटावरून महसूल विभागाच्या आशीर्वादाने नियमबाह्यपणे पोकलँड मशीनने सर्रास रेतीचा उपसा सुरु आहे. महसूल प्रशासनाच्या नियमानुसार यंत्राने रेती उपसा करता येत नाही. सध्या येथे रेती डम्पींग करणे सुरु आहे. वनविभागाच्या जागेवर डम्पींग केली जात आहे.तामसवाडी रेती घाट महसूल प्रशासनाने लिलाव केला आहे. लिलावात महसूल प्रशासनाने यंत्राच्या मदतीने रेती उपसा करता येत नाही. अशी प्रमुख अट घातली आहे. परंतु येथे नदीपात्रात पोकलँड मशीनने सर्रास रेती उत्खनन करणे सुरु आहे. पावसाळा तोंडावर आल्याने नदी काठावरील वनविभागाच्या जागेवर डम्पींग करणे सुरु आहे.संपूर्ण नदी पात्रात इतरही स्थळी पोकलँड मशीन सर्रास येथे दिसतात. नदी पात्र विस्तीर्ण असल्याने सीमा कुठून कुठपर्यंत आहेत हे समजत नाही. बाम्हणी, घाटकुरोडा घाट जवळ आहे. घाटकुरोडा नदीघटावरही पोकलँडने रेती उपसा सुरु आहे.महसूल विभागाचे अधिकारी नदीकाठावर गेले तेव्हा संबंधित लोक घाटकुरोडा घाटाकडे पळ काढतात व घाटकुरोडा घाटावर कारवाई सुरु केली तर तामसवाडी घाटाकडे पळ काढतात असा क्रम येथे सुरु आहे.नदीपात्रतून मशीनने रेती उपशाकरिता रितसर जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी येथे कोणत्याच कंत्राटदारांनी घेतली नाही. जिल्हाधिकारी विशेष परिस्थितीत तशी परवानगी देवू शकतात. परंतु तशी स्थिती येथे नाही. तुमसर व तिरोडा तालुक्यातील शेकडो रेतीचे ट्रक तुमसर - भंडारा व नागपुरला धावतात. ही सर्व वाहने ओव्हरलोड असतात. परंतु त्यांच्यावर कारवाई अजूनपर्यंत झाली नाही.येथे महसूल पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अर्थकारण दडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तामसवाडी (सि.) रेतीघाटावर नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून पोकलँड मशीनने मोठी नाली खोदकाम करण्यात आले आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी येथे कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)