शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘त्या’ प्रवाशांचे नशीब बलवत्तर ठरले

By admin | Updated: June 23, 2015 01:12 IST

रस्त्यावरील बकऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

भिलेवाडाजवळील घटना : बसची विद्युत खांबाला धडक, बकऱ्या आल्या आडव्याभंडारा : रस्त्यावरील बकऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यात अनियंत्रित बस रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला धडकली. बसमध्ये प्रवास करणाऱ्या ४५ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. त्यांचे नशिब बलवत्तर असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची घटना आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान भिलेवाडा जवळ घडली. नागपूर आगाराची एनआर २ एमएच १२ इ एफ ६७१० या क्रमांकाची बस गोंदिया येथून नागपूरकडे निघाली होती. या बसवर चालक म्हणून चंद्रकुमार ओमकार तर वाहक म्हणून पी. के. अहिरकर हे कर्तव्यावर होते. गोंदिया येथून नागपूरला निघालेल्या या बसमध्ये ४५ प्रवाशी प्रवास करीत होते. रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना काही प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान भिलेवाडा गावाजवळील एक गुराखी बकऱ्यांचा कळप घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून जात होता. भरधाव बसखाली बकऱ्या येऊन चिरडू नये म्हणून चालकाने बसचे करकचून ब्रेक लावले. रस्त्यावरील पावसाच्या पाण्यामुळे बस अनियंत्रीत झाल्याने रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावर बस आदळली.विद्युत प्रवाह सुरु असताना हा अपघात झाल्याने प्रवाशांनी एकच किंचाळी फोडली. मात्र त्यांचे नशिब बलवत्तर असल्याने विद्युत तारा तुटून बसवर कोसळल्या नाही. जर, असा प्रकार घडला असता तर बसमधील ४५ प्रवाशांसह चालक, वाहकांवरही दुर्देवी प्रसंग ओढावला असता. या अपघातातून सुखरुप बचावल्यानंतर अनेक प्रवाशांच्या तोंडून आपोआपच देव तारी त्याला कोण मारी हा प्रत्यय आल्याचा अनुभव व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)