शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिनरल वॉटरपेक्षा तुमसरचे पाणी शुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 00:34 IST

कोष्टी तसेच माडगी घाटावरून तुमसर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. पुरवठा होणारे पाणी दूषित नसून...

निर्वाळा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले प्रमाणित, प्लाँट सुरू मास्कुलेटर बंद तुमसर : कोष्टी तसेच माडगी घाटावरून तुमसर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. पुरवठा होणारे पाणी दूषित नसून ते मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध असल्याचा निर्वाळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता यांनी फिल्टर प्लाँटच्या पाहणी दरम्यान केला.गत काही दिवसापासून शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची ओरड आहे. त्याच राजकारण घडवून शहरात असंतोष पोटविण्याचा प्रयत्न झाला. शहरातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत करता यावा, म्हणून नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांना मार्गदर्शन मागितले. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता ए. जी. जिभकाटे, सहाय्यक अभियंता संग्राम मस्के, शाखा अभियंता प्रविण मेहर यांच्या चमूने तुमसर येथील फिल्टर प्लाँटला भेट देवून नदीच्या पाण्याचे तसेच फिल्टर झालेल्या पाण्याचे नमुने तपासले. यात नगर परिषदेमध्ये होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या तुलनेत कितीतरी पटीने तुमसरचे पाणी निर्मळ असून ते मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला. फिल्टर प्लाँट बंद आहे का? असा प्रश्न उपविभागीय अभियंता यांना विचारला असता फिल्टर प्लाँट बंद नाही, त्यातील मास्कुलेटर केवळ बंद आहे. त्यामुळे पाणी फिल्टर होण्यास काही अडचण निर्माण होत नाही. मास्कुलरचे कार्य हे पाण्यात तुरटी फिरविण्याचे आहे. पाण्यातला गाळ तळाला आणते. केवळ एवढेच कार्य मास्कुलेटरचे आहे. जर हा मास्कुलेटर सुरु झाल्यास आणखीही शुद्ध पाणी शहाराला मिळू शकते, असेही यावेळी त्यांनी सांगितले. शहरातील नेहरु वॉर्डातील पाण्याच्या टाकीत अशुद्ध पाणी येत असल्याची पुष्टी देत त्यांनी कोष्टी पंपात बिघाड आल्याचे सांगून पाईपलाईन खराब झाली आहे. तशी माहिती नगरपालिकेने दिली असून त्यात कोणत्या पद्धतीने सुधारणा करण्यात येईल, ते नकाशाच्या अभ्यासावरून कळेल. त्यानुसार पालिका प्रशासन लवकरच निर्णय घेणार असल्याचेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चमुंनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे, संदीप पेठे, मनिष अग्रवाल, राकेश धार्मिक यांच्यासह नगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)