शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

तीन तलावात अत्यल्प जलसाठा

By admin | Updated: August 30, 2015 00:24 IST

तुमसर तालुक्यातील मोठ्या जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. मार्च महिन्याची चाहूल आतापासून लागली असून पाण्याचे नियोजन कसे करावे या चिंतेने प्रशासनाला ग्रासले आहे.

दप्तरदिरंगाई : गायमुख, कारली, बघेडा तलावांचा समावेश, सांसद ग्राम बघेडाचा समावेशतुमसर : तुमसर तालुक्यातील मोठ्या जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. मार्च महिन्याची चाहूल आतापासून लागली असून पाण्याचे नियोजन कसे करावे या चिंतेने प्रशासनाला ग्रासले आहे. दोन महिन्यापूर्वी राज्य पाटबंधारे विभागाने बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा उपसा करण्याचे पत्र दिले होते. परंतु त्याची दखल न घेतल्याने आंबागड, कारली व बघेडा जलाशयात अत्यल्प पाणीसाठा आहे.तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्पामुळे हरितक्रांतीचे स्वप्न साकार होणार असे स्वप्न शासन व प्रशासनाने दाखविले. परंतु या प्रकल्पातून या मोसमात पाण्याचा उपसा आंबागड, कारली व बघेडा जलाशयात केला असता तर सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाले असते. दोन महिन्यापूर्वी राज्य पाटबंधारे विभागाने बावनथडी प्रकल्प कार्यालयाला पाणी उपसा करण्याचे प त दिले होते. परंतु त्या कार्यालयाकडून आतापावेतो उत्तर मिळाले नाही.सद्यस्थितीत चांदपूर जलाशयात २७ टक्के जलसाठा आहे. आंबागड तलावात १३.६५ टक्के जलसाठा असून ३५.८३ हेक्टर तलाव क्षेत्र आहे. तलावाची सिंचन क्षमता २०८ हेक्टर आहे. कारली जलाशयात ३७ टक्के जलसाठा आहे. सिंचन क्षमता २६० हेक्टर असून तलावाचे क्षेत्र ७० हेक्टर आहे. बघेडा तलावात ४५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सिंचन क्षमता १४९८ हेक्टर इतकी असून तलावाचे क्षेत्र १३० हेक्टर इतके आहे.नियमानुसार शेती सिंचनाकरिता २५ टक्के तलावात जलसाठा असणे आवश्यक असून त्यापेक्षा जास्त जलसाठा असला तरच सिंचनाकरिता पाणी देता येते. आंबागड, कारली व बघेडा तलावात पाणी उपसाची सोय आहे. आंबागड, कारली व बघेडा तलावात पाणी उपसाची सोय आहे. आंबागड तलाव सिंचनाकरिता उपलब्ध होणार नाही. येथे मासे नाही. व्यवसायही संकटात सापडला आहे. बघेडा हे गाव सांसद दत्तक ग्राम योजनेत समाविष्ट आहे हे विशेष. उन्हाळ्यात बघेडा तलावात पाणी उपसा करण्यात आला होता. या हंगामात पाणी उपसा झाले नाही. (तालुका प्रतिनिधी)