शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

झिरो अटेंडन्सला खो

By admin | Updated: June 2, 2017 00:21 IST

यंदाचा बारावीचा निकाल अपेक्षेप्रमाणे बरा लागला. यात बहुतांश विद्यार्थी शालेय शिक्षणासोबतच शिकवणी वर्गाचाही साथ घेत होती.

लोकमत शुभवर्तमान : दहावीच्या निकालानंतर वाढणार लगबग लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यंदाचा बारावीचा निकाल अपेक्षेप्रमाणे बरा लागला. यात बहुतांश विद्यार्थी शालेय शिक्षणासोबतच शिकवणी वर्गाचाही साथ घेत होती. परंतु काळानुरुप शाळेत नोंदणी करून फक्त शिकवणी वर्गाला जायचे हा फंडा या वर्षी विद्यार्थ्यांनीच मोडून काढल्याचे दिसत आहे. झिरो अटेंडन्स ही मनोप्रवृत्ती बदलत असल्याने येणाऱ्या काळात याचे चांगले प्रतिसाद पाहायला मिळतील यात दुमत नाही.इयत्ता दहावीचा निकाल लागला ही कुजबूज सुरु होते, ती इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी. काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश न घेता अन्यत्र व्यवसायीक अभ्यासक्रमाकडेही वळतात. अकरावीत आपल्या आवडत्या शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर शिक्षणाला किंवा त्या सत्राला सुरुवात होते. परंतु बऱ्याच पालकांचा किंबहुना विद्यार्थ्यांचा कल अशा शाळांमध्ये असतो की जिथे झिरो अटेंडन्सला प्राधान्य दिले जात असते. मात्र या वर्षीच्या बारावीच्या निकालात ज्या शाळांमध्ये नियमित इयत्ता १२ वी चे वर्ग झाले, अभ्यासक्रम पूर्ण झाला व सराव परीक्षा यशस्वीपणे पार पडली. अशा शाळांचा निकालही उत्कृष्ट लागल्याचे दिसून आले. शाळेमध्ये प्रवेश घेऊन शाळेच्या तासिकेला, प्रात्यक्षिकांना गैरहजर राहणे, शाळेच्या विविध स्पर्धांपासून दूर राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होऊ शकतो ही धारणाच विद्यार्थ्यांनीच झिडकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून सर्वांगिण शिक्षण ही मुलभूत संकल्पना रूजू करीत आहे. यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक विकासावरही भर देत आहे. अशा स्थितीत झिरो अटेंडन्स या संस्कृतीला खतपाणी घालणे म्हणजे भविष्यातील पिढीला संकटात घालण्यासारखे आहे. हीच बाब हेरून प्राचार्यांसह काही उमद्या शिक्षकांनीही झिरो अटेंडन्सला विरोध करून पालकांमध्ये जागृतीचे कार्य अविरत सुरु केले आहे. येणाऱ्या शैक्षणिक सत्रातही शाळेत प्रवेश घेऊन अन्यत्र शिक्षणाला किंवा शिकवणी वर्गाला जाणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसविता येईल असे वाटत आहे.झिरो अटेंडन्स ही मनोप्रवृत्ती हळूहळू नष्ट झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा विकास शिकवणी वर्गातून नव्हे तर शाळेतूनच झाला पाहिजे. विद्यार्थ्यांचे मनोबल व शिक्षणाकडे त्यांचा कल शाळेतील उपस्थितीमुळे वाढला आहे. लालबहादूर शास्त्री विद्यालयातही झिरो अटेंडन्स या उपक्रमाला प्राधान्य देण्यात येत आहे.- डी.व्ही. देशमुख, प्राचार्य, शास्त्री विद्यालय, भंडारा.